मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवार, १७ मे रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठाणे-कल्याण, पनवेल-वाशी (Railway) तसेच पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी ब्लॉक घेतला जाईल. यामुळे लोकल फेऱ्या रद्द होतील, काही गाड्या वळवण्यात येतील तर मेल-एक्स्प्रेसला विलंब होईल. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.

संध्याकाळी घरी परतण्यासाठी याच लोकलचा वापर मुंबईकरांकडून केला जातो. मात्र अहोरात्र धावणारा, अविरत प्रवास करणाऱ्या या लोकलनाही गेखभाल, दुरूस्तीची गरज असते, आणि त्यासाठी या तिन्ही मार्गांवर आलटून पालटून ब्लॉक घेत, ही कामं केली जातात. (Railway) उद्या, म्हणजेच रविवार 17 मे रोजीदेखील रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी, मुलांच्या शाळांना लागलेल्या सुट्ट्या हे पाहून भटकण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार असेल तर आधी ही बातमी वाचा आणि मगच प्लान आखा.ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने उद्या रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नायगाव स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते :पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहतील. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे : नायगाव स्थानकात नवीन पादचारी पुलाचे दोन स्पॅन गर्डर उभारले जाणार आहेत
वेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर 1 ते रविवारी पहाटे 4 दरम्यान अप आणि डाउन धीमा मार्ग बंद राहणार. तसेच मध्यरात्रीनंतर 2.30 ते 3.30 दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
परिणाम : ब्लॉक वेळेत लोकल गाड्या पर्यायी मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. (Railway) काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 13 मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 20 मिनिटे ते 2 तास अशा विलंबाने धावणार आहे.
डोंबिवली लोकलमधून पडून तरुण जखमी दरम्यान डोंबिवलीकडून मुंबईत कामावर निघालेला गणेश अय्यर (वय 23) हा तरुण गर्दीच्या लोकलमधून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गुरुवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या या तरुणावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी