राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या (farmers)घरात, गोठ्यात आणि शेतात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.सरकारने पूरग्रस्त भागातील खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यापैकी १५ हजार रुपये आगाऊ स्वरूपात, तर काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधी देण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार, येत्या सात दिवसांत तांत्रिक अधिकाऱ्यांकडून विहिरींची पाहणी करण्यात येणार आहे. पंचनामे झालेल्या विहिरींच्या शेतकऱ्यांनी (farmers)गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अर्जासोबत विहिरीचा सातबारा आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटो जोडणे आवश्यक आहे. तसेच, विहिरीचे जीओ-टॅगिंग करून प्रत्यक्ष स्थळ मोजमाप घेतले जाईल. काम समाधानकारक झाल्यानंतर उर्वरित निधी वितरित केला जाईल.

सरकारने स्पष्ट केले आहे की, या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी या आर्थिक वर्षातच खर्च करावा, अन्यथा उर्वरित रक्कम शासनाकडे परत करावी लागेल.ही योजना पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, सिंचन व्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा :

शाळेच्या दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या जाहीर….
भारतातील ‘या’ लोकांना नाही मतदानाचा हक्क, कारण घ्या जाणून…
फक्त रोहित शर्मा अन् विराट कोहली नव्हे, 5 खेळाडूंवर टांगती तलवार….