जुन्या गाड्यांच्या मालकांसाठी एक मोठी खबरदारीची बातमी आहे. 1 जुलै 2025 पासून दिल्लीमध्ये ‘End of Life’ वाहनांना पेट्रोल-डिझेल(Petrol-diesel) देण्यास मनाई करण्यात आली आहे. सीएक्यूएम ने हा निर्णय घेतला असून, हळूहळू संपूर्ण एनसीआर मध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

EoL म्हणजे काय? :
सरकारच्या नव्या धोरणानुसार:
इंधन प्रकार कमाल वापर कालावधी
डिझेल 10 वर्षे
पेट्रोल 15 वर्षे
यापेक्षा जुन्या गाड्यांना EoL म्हणून घोषित केलं जाईल. अशा वाहनांना इंधन भरण्यास मनाई असेल.
ANPR तंत्रज्ञानाद्वारे थेट ओळख :
ANPR कॅमेरे पेट्रोल(Petrol-diesel) पंपांवर बसवण्यात आले असून, ते वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करून ‘VAHAN’ डेटाबेसशी तुलना करतात. जर गाडीचा कालावधी संपलेला असेल, तर ती थेट “EoL” म्हणून नोंदवली जाईल आणि इंधन नाकारले जाईल.
कधी कुठे लागू होणार? :
लागू होण्याची तारीख व ठिकाण
१ जुलै २०२५ – दिल्ली
१ नोव्हेंबर २०२५ – गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, सोनीपत
१ एप्रिल २०२६ – उर्वरित NCR परिसर

नियम मोडल्यास काय होणार? :
गाडीची माहिती एजन्सीकडे पाठवली जाईल
– संबंधित वाहन जप्त केलं जाऊ शकतं
– स्क्रॅपिंगची प्रक्रिया सुरू केली जाईल
– पेट्रोल पंपावर नियम तोडल्यास संबंधित पंपावर कारवाई
दिल्ली परिवहन विभागाने 100 मॉनिटरिंग टीम्स नियुक्त केल्या आहेत. त्या ANPR कॅमेर्यांद्वारे डेटावर लक्ष ठेवणार, नियम तोडणाऱ्या गाड्यांची माहिती गोळा करणार आणि उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करतील.
हेही वाचा :
इस्रायल/इराण युद्धात, आता अमेरिका उतरली
Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?
विजय देवरकोंडाच्या अडचणीत वाढ, SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?