शहापूर येथील यड्राव भागात उघड्यावर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (police)मोठा छापा टाकला आहे. पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात युहान सुनील भोरे (वय 21), प्रभाकर भीमराव माळगे (36), मुबारक महम्मद तांबोळी (59), अजय पांडुरंग लोंढे (27), प्रवीण बाबुराव जाधव (22), विनायक नारायण जगताप (41), दीपक प्रकाश कांबळे (33), शिवानंद हिराप्पा आवटी (35), हुसेन मौला अंकलगे (42) आणि फक्रुद्दीन महम्मद मुल्ला (48) या दहा संशयितांना पकडण्यात आले.

या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 41,800 रुपये, तसेच 9 मोबाईल, अशी एकूण 89,300 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. पोलीस(police) कॉन्स्टेबल सद्दाम गजबर सनदी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही कारवाई फक्त चार दिवसांत दुसरी असल्याने शहापूर परिसरात खळबळ उडाली आहे, आणि स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारावरून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

चक्क 50% डिस्काउंट; 22 हजारचा मोबाईल 12 हजारात
भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका…
रेखा यांचं बिग बींबद्दल लक्षवेधी वक्तव्य, ‘माझे त्यांच्यासोबत खासगी संबंध…