दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहात फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मिड-बजेट स्मार्टफोन मोटोरोला G96 5G वर आकर्षक सवलत मिळत आहे. जुलै 2025 मध्ये लॉन्च झालेला हा फोन (mobile)आता फक्त 12,000 रुपयांपासून घरी आणण्याची संधी देतो. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणारा हा डिव्हाइस 5,500mAh पॉवरफुल बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP Sony Lytia 700C मेन कॅमेर्‍यासह येतो, ज्यामुळे तरुणांसाठी हा आकर्षक पर्याय ठरतो.

मोटोरोला G96 5G ची मूळ किंमत 20,999 रुपये असून टॉप व्हेरिएंट 22,999 रुपयांचा आहे. मात्र फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ही किंमत 15,999 रुपये करण्यात आली (mobile)आहे. याशिवाय, SBI क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळते. तसेच, जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 3,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, ज्यामुळे हा फोन फक्त 12,000 रुपयांत मिळवता येईल. एक्सचेंजची रक्कम जुना फोन किती चांगल्या स्थितीत आहे त्यावर अवलंबून आहे.

फोनमध्ये 6.67 इंच FHD+ 3D कर्व्ड डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 1600 निट्स ब्राइटनेस, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आणि वॉटरड्रॉप टचस्क्रीन डिस्प्ले आहे. Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह हा फोन Android 15 आधारित Hello UI वर चालतो. 5,500mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय IP68 रेटिंग, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह हा फोन परिपूर्ण बनतो.फ्लिपकार्टवर Ashleigh Blue, Dresden Blue, Orchid आणि Green रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असल्यामुळे दिवाळीच्या आनंदाला डबल करण्यासाठी आजच खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा :

पाक / अफगाण सीमेवर युद्धसदृश्य ताण तणाव…
सोनं-चांदी पुन्हा चमकलं! दरवाढीने बाजारात खळबळ…
पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट; पेन्शन कमीत कमी 1000 रुपयांनी वाढणार…