भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका पार पडली, या मालिकेच्या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने(Team India) त्याच्या घरच्या मैदानावर मालिकेचा दुसरा सामना 7 विकेट्ने जिंकला आहे. भारताच्या फलंदाजांनी पहिल्याच डावामध्ये 518 धावा केल्या होत्या यामध्ये टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये 248 गुंडाळले होते. त्यानंतर फोलोअपची घोषणा केली होती. यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावामध्ये दमदार कमबॅक केला होता. फोलोअपमध्ये दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या संघाने 390 धावा केल्या.

भारताच्या फलंदाजांनी या सामन्यात दोन शतके झळकावली तर पहिल्या सामन्यामध्ये तीन शतके झळकावण्यात आली होती. पहिल्या सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू रविद्र जडेजा यांने शतक पुर्ण केले होते. त्याचबरोबर या मालिकेमध्ये केएल राहुलची देखील दमदार कामगीरी राहिली. त्याचबरोबर त्याने दुसऱ्या डावामध्ये देखील अर्धशतक झळकावले. या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये त्याने 102 चेंडुमध्ये 50 धावा पुर्ण केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर ५१८ धावा केल्या आणि त्यांचा डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर मर्यादित राहिला. या मालिकेत वेस्ट इंडिजची खराब फलंदाजी (Team India)पाहून भारताने फॉलो-ऑन लादला. फॉलो-ऑनमुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना त्रास झाला आणि त्यांनी शानदार कामगिरी करत ३९० धावा केल्या आणि भारतावर आघाडी घेतली.भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलो-ऑन दिल्यानंतर टीम इंडियाला फलंदाजी करावी लागण्याची ही चौथी वेळ आहे. वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्यापैकी टीम इंडियाने १ गडी गमावून ६३ धावा केल्या आहेत.
हेही वाचा :
पाक / अफगाण सीमेवर युद्धसदृश्य ताण तणाव…
सोनं-चांदी पुन्हा चमकलं! दरवाढीने बाजारात खळबळ…
पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट; पेन्शन कमीत कमी 1000 रुपयांनी वाढणार…