भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून (captain)पुनरागमन करणार आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी त्याने मुंबईत झालेल्या सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली, आणि त्याच्या उपस्थितीने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. सर्वांना आता पुन्हा एकदा मैदानावर “हिटमॅन”ला पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र, या समारंभातील एका छोट्याशा घटनेने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की रोहित शर्मा होणं सोपं नाही.

कार्यक्रमादरम्यान जेव्हा श्रेयस अय्यर आपला पुरस्कार घेऊन परतत होता, तेव्हा त्याच्याकडून तो पुरस्कार चुकून खाली ठेवला. त्या वेळी जवळ बसलेल्या रोहित शर्माने क्षणाचाही विलंब न करता ट्रॉफी उचलली आणि ती आदरपूर्वक टेबलावर ठेवली. या साध्या पण अर्थपूर्ण कृतीने सर्व उपस्थितांना एक मोठा संदेश दिला खरे(captain) महान खेळाडू केवळ मैदानावरच्या कामगिरीने नव्हे, तर त्यांच्या वर्तनानेही ओळखले जातात. या घटनेचा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि चाहते रोहितच्या साधेपणाचं आणि आदरयुक्त वृत्तीचं कौतुक करू लागले.

सीएट अवॉर्ड्समधील रोहितची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. तो पूर्णपणे फिट, आत्मविश्वासपूर्ण आणि ऊर्जावान दिसत होता. त्याच्या टोनड शरीरयष्टी आणि आत्मविश्वासाने चाहत्यांच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली आहे की मैदानावर तोच जुना “हिटमॅन” परत येणार.क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, जर रोहितने हा फॉर्म आणि तंदुरुस्ती कायम ठेवली, तर तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा अविभाज्य भाग राहू शकतो.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार….
विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता फरार..
ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने….