क्रिकेटविश्वाच्या स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि माहिका शर्माच्या चाहत्यांसाठी रोमँटिक बातमी समोर आली आहे. माहिका शर्माने सोशल मीडियावर हार्दिकसोबत एक रोमँटिक(Romantic) इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यात दोघे हातात हात घेऊन दिसत आहेत. या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी काही दिवसांपासून हार्दिक आणि माहिकाचे नाव डेटिंगमध्ये जोडले जात होते. ते मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्याने चर्चा अधिकच जोर धरली होती. आता माहिकाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधील फोटोवरून हे स्पष्ट झाले की दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

स्टोरीमध्ये माहिकाने फोटो कोलाज शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तिचा हात हार्दिकच्या हातात दिसतो, तर दुसऱ्या फोटोत फूड्सचे फोटो आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये समुद्रकिनारी पाठमोरी उभारलेली दिसते आणि काही व्हेकेशन फोटोही आहेत. यामुळे दोघांनी प्रेमाची सार्वजनिक कबुली दिल्याचे लक्षात येते.
पूर्वी व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये हार्दिकने माहिकाच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतो आणि तिला टॅग करून फोटो शेअर केला होता. दुसऱ्या स्टोरीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट झलक असून दोघे रोमँटिक(Romantic) पोजमध्ये दिसतात. हार्दिकने या पोस्टवर evil eye इमोजी वापरले आहे. या सर्व इन्स्टाग्राम पोस्टमुळे हार्दिक-माहिका यांचं रिलेशनशिप फॅन्ससाठी खुलं झाले आहे.
हेही वाचा :
यड्राव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांवर कारवाई…
जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट…
चक्क 50% डिस्काउंट; 22 हजारचा मोबाईल 12 हजारात