सहकुटुंब पाणीपुरी खायला गेलेल्या महिलेला आधी त्यात केस सापडला. तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. पण शेवटच्या पाणीपुरीत तिला एक हाडूक सापडलं. त्यानंतर तिचा पारा चढला.

रस्त्यावरील अन्न पदार्थांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रस्त्याच्या कडेला पाणीपुरी खाताना एका महिलेला त्यात हाड सापडलं . या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (panipuri) घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. नगरपालिकेनं तातडीनं कारवाई करत संबंधित पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई केली आहे. त्याला १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रानीप येथील बीआरटीएस बस थांब्याजवळ ‘कृष्णा भेल’वाल्याकडे एक महिला पाणीपुरी खायला गेली होती. ही महिला रविवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास कुटुंबासह पाणीपुरीचा आस्वाद घ्यायला गेली होती. तिथे घडलेल्या गंभीर घटनेचा व्हिडीओ महिलेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाणीपुरी खात असताना महिलेला सुरुवातीला त्यात एक केस सापडला. महिलेनं त्यावरुन वाद घातला. (panipuri) तिनं त्या केसाकडे दुर्लक्ष केलं नाही. शेवटची पाणीपुरी खात असताना महिलेला त्यात एक हाड सापडलं. पाणीपुरीत हाड सापडल्यानं महिलेला धक्काच बसला. तिनं याबद्दलची तक्रार पाणीपुरीवाल्याकडे केली. सुरुवातीला पाणीपुरी विक्रेत्यानं ती वस्तू हाड असल्याचं मानण्यास नकार दिला. तो लाकडाचा लहानसा तुकडा असल्याचं म्हणत त्यानं वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
महिलेनं तीच वस्तू तिथे असलेल्या अन्य ग्राहकांना दाखवली. तेव्हा त्यांनीही ते हाडच असल्याचं सांगितलं. ती वस्तू लाकूडच असल्याचं सिद्ध करण्यासाठी दुकानदारानं ती चाकूनं कापण्याचा प्रयत्न केला. पण बरेच प्रयत्न करुनही ती वस्तू कापलीच गेली नाही.(panipuri) त्यामुळे ती वस्तू हाडच असल्याचा संशय दुकानदारालाही आला. त्यानंतर त्यानं महिलेची माफी मागितली. हाड कुठून तरी उडून आलं असावं, असं थातुरमातुर उत्तर देत त्यानं विषय संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला प्रचंड संतापली.या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. त्याची दखल अहमदाबाद नगरपालिकेच्या अन्न विभागानं घेतली. त्यांच्या पथकानं ‘कृष्णा भेल पकोडा’ नावाचा स्टॉल जप्त केला. सोबतच स्टॉल चालक दिनेश तेलीवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?