‘या’ दिवशी केरळमध्ये धडकणार मान्सून उष्णतेपासून दिलासा मिळणार

२००५ पासून ‘आयएमडी’कडून केरळमधील मान्सून आगमनाचा अधिकृत अंदाज जाहीर केला जात आहे. गेल्या २१ वर्षांपैकी २०१५ वगळता बहुतांश अंदाज अचूक ठरले असल्याचा दावा विभागाने केला आहे.

सुनयना सोनवणे /पुणे: देशभरात उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले (monsoon) असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलासादायक माहिती दिली आहे. यंदा नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तो नेहमीपेक्षा तब्बल सहा दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अंदाजामध्ये चार दिवसांची त्रुटी गृहीत धरण्यात आली आहे. सामान्यतः नैऋत्य मान्सूनचा केरळमधील प्रवेश १ जून रोजी होतो. मात्र, यंदा वातावरणीय स्थिती अनुकूल असल्याने मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचे संकेत मिळत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

सध्या हिंदी महासागराच्या विस्तृत क्षेत्रावर विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचबरोबर नैऋत्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, (monsoon) त्याच्या प्रभावामुळे अंदमान-निकोबार बेटांसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी भागांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून आगमनासाठी आवश्यक असलेले निकष झपाट्याने पूर्ण होत असल्याने दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर शनिवारी मान्सून दाखल होऊन यंदाच्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.

मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामान विभागाने अत्याधुनिक स्वदेशी सांख्यिकीय मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पातील पूर्वमान्सून पर्जन्य, दक्षिण चीन समुद्रावरील ओएलआर, आग्नेय हिंदी महासागरातील वारे, नैऋत्य पॅसिफिक क्षेत्रातील ओएलआर आणि ईशान्य हिंदी महासागरातील निम्नस्तरीय वारे अशा सहा महत्त्वाच्या घटकांचा विचार केला जातो.२००५ पासून ‘आयएमडी’कडून केरळमधील मान्सून आगमनाचा अधिकृत अंदाज जाहीर केला जात आहे. (monsoon) गेल्या २१ वर्षांपैकी २०१५ वगळता बहुतांश अंदाज अचूक ठरले असल्याचा दावा विभागाने केला आहे.25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

केरळमधील मान्सून आगमनाच्या तारखा
(कंसात ‘आयएमडी’ने वर्तवलेली तारीख)
२०२५ — २४ मे (२७ मे)
२०२४ — ३० मे (३१ मे)
२०२३ — ८ जून (४ जून)
२०२२ — २९ मे (२७ मे)
२०२१ — ३ जून (३१ मे)
२०२० — १ जून (५ जून)

हेही वाचा

जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात

ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?