उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात ‘खाया पिया कुछ नहीं, गिलास तोड़ा बारह आना’ या म्हणीचं खरंखुरं उदाहरण समोर आलं आहे. एका पतीने(Husband) संशयाच्या भरात निर्दोष तरुणाची अशी बेदम धुलाई केली की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत हॉटेलमध्ये असल्याचा गैरसमज झाल्याने संतापलेल्या पतीने चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केले.मिळालेल्या माहितीनुसार, मौरानीपूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. आरोपी पती मुकेश आर्य याला माहिती मिळाली की त्याची पत्नी एका शेजाऱ्यासोबत हॉटेलमध्ये आहे. संतापाच्या भरात तो थेट हॉटेलमध्ये पोहोचला आणि तिथे उपस्थित असलेल्या सोनू उर्फ प्रमोद आर्य या तरुणाला पत्नीचा प्रियकर समजून त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.

प्रत्यक्षात सोनू हा त्या महिलेला हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी मदत करत होता, मात्र संतापलेल्या पतीने काहीही विचार न करता त्याच्यावर हल्ला केला. एवढंच नव्हे तर सोनूचे वडील आणि भाऊ त्याला वाचवायला आले तेव्हाही मुकेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मौरानीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.या घटनेचा व्हिडीओ उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये काही लोक एका तरुणाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसते.

सोनूने आपल्या जबाबात सांगितले की, तो केवळ त्या महिलेला मदत करत होता. दुसरीकडे, आरोपी पती मुकेश आर्यने सांगितले की, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तो हॉटेलमध्ये पोहोचला आणि गैरसमजातून हा प्रकार घडला. संबंधित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिचा सोनूसोबत कोणताही संबंध नाही, तो निरपराध असून तो फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता.पोलिसांनी आरोपी पतीला (Husband)अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून लोकांमध्ये या प्रकरणाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

यड्राव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांवर कारवाई…
जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट…
चक्क 50% डिस्काउंट; 22 हजारचा मोबाईल 12 हजारात