हैदराबाद येथून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका बाल संरक्षण (Child protection)गृहात १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबादच्या सईदाबाद परिसरातील एका सरकारी बाल संरक्षण गृहात घडली आहे. ज्या ठिकाणी मुलांचं संरक्षण आणि काळजी घेतली जाते. त्याच ठिकाणी एका १० वर्षांच्या मुलासोबत घृणास्पद कृत्य झाल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारी संरक्षण गृहात (Child protection)राहणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्याच संस्थेच्या सुपरवायझरने एकदा नव्हे तर बऱ्याचदा लैंगिक अत्याचार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, मी महिन्यात अल्पवयीन पीडित मुलावर सतत लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेमुळे पीडित मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो त्याच्यासोबत घडलेल्या धक्कदायक घटनेबाबत काहीच सांगू शकत नव्हता.

पीडित मुलगा दसऱ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या घरी गेला होता. त्यामुळे आपला मुलगा नाराज आणि शांत असल्याने त्याच्या आईने पाहिलं. आईने मुलाची विचारपूस केली तेव्हा त्याने रडत रडत त्याच्यासोबत घडलेली धक्कदायक घटना आईला सांगितली. संरक्षण गृहात सुपरवायझर मुलासोबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं कळताच पीडित मुलाच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, तातडीने या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून आरोपी सुपरवायझर विरोधात पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने संरक्षण गृहातील इतर मुलांसोबत सुद्धा असंच कृत्य केलं आहे का? याबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून गरज पडल्यास इतर पीडित मुलांचे देखील जबाब नोंदवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा :

पत्नी हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत.. हे ऐकताच पती….
महामार्गावरील घाणेरड्या शौचालयाचा फोटो पाठवा अन् जिंका Fastag मध्ये 1000 रुपये..
महाराष्ट्रात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव, ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण..