कोरोना महामारीनंतर जगावर पुन्हा एका नव्या संकटाचे सावट घोंगावू लागले आहे. मलेशियामध्ये वेगाने पसरणाऱ्या इन्फ्लूएंझा संसर्गामुळे सरकारची चिंता वाढली आहे. धोकादायक बाब म्हणजे लहान मुलांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अन मलेशियाच्या शिक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यानुसार, मलेशियातील ६,००० हून अधिक विद्यार्थ्यांना इन्फ्लूएंझा (influenza)झाल्याचे आढळले आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विशेषतः जास्त प्रभावित भागात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने लोकांना स्वच्छता राखण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मलेशियाच्या शिक्षण मंत्रालयाचे महासंचालक मोहम्मद आझम अहमद यांनी सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “नव्याने पसरलेल्या इन्फ्लूएंझा (influenza)संसर्गाची पद्धत कोरोनाव्हायरससारखीच आहे. आम्हाला संसर्गजन्य रोगांशी सामना करण्याचा अनुभव आहे आणि आम्ही त्या सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशातील सर्व शाळांना कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना फेस मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच गर्दी जमवण्यासही मनाई करण्यात आली आहे.. पण त्याचवेळी मलेशिया सरकारने लॉकडाऊनसारखी कोणतीही परिस्थिती नाकारली आहे.

मोहम्मद आझम अहमद यांनी इन्फ्लूएंझा बाधित शाळांची अचूक संख्या दिली नाही, परंतु संपूर्ण देशात संसर्ग पसरल्याची पुष्टी केली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत, देशभरातील अनेक शांळांमध्ये संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आली होती. यात सेलांगोरमध्या सर्वाधिक संसर्गाच्या नोंदी झाल्या होत्या. त्यानंतर क्वालालंपूर, पुत्रजया, पेनांग, जोहोर आणि केदाह यां ठिकाणांवरूनही संसर्गाच्या नोंदी वाढू लागल्या.

डॉ. शरीफा एझत वान पुतेह यांनी पालकांना त्यांच्या मुलांसाठी फ्लू लसीकरणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. वार्षिक लसीकरण आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा विषाणू कालांतराने त्यांचे रुप बदलत असतात, त्यामुळे लस दरवर्षी अद्यतनित केली जाते. ही फ्लू लस सहा महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी आहे.

आरोग्य मंत्री डॉ. झुल्केफ्ली अहमद म्हणाले की, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालय शिक्षण मंत्रालयाशी पुढील उपाययोजनांवर चर्चा करत आहे. रुग्णांमध्ये वाढ होण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याने काही कठोर पावलेही उचलली गेली आहेत. परंतु काळजी करण्यासारखे काहीही नाही.

हेही वाचा :

चक्क 50% डिस्काउंट; 22 हजारचा मोबाईल 12 हजारात
भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका…
रेखा यांचं बिग बींबद्दल लक्षवेधी वक्तव्य, ‘माझे त्यांच्यासोबत खासगी संबंध…