नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. CBTच्या 238 व्या बैठकीत मान्यता देण्यात आली की, आता EPF सदस्य किमान शिल्लक वगळता खात्यातील उर्वरित 100% रक्कम सहज काढू (withdraw)शकतील. ही सवलत 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी लागू होणार आहे.

पूर्वी EPF मधील पैसे फक्त बेरोजगारी किंवा सेवानिवृत्तीच्या घटनेत काढता येत होते. त्यावेळी सदस्य एक महिन्यानंतर 75% आणि दोन महिन्यांनंतर उर्वरित 25% काढू(withdraw) शकत होते. मात्र आता, किमान शिल्लक 25% ठेवून उर्वरित 75% रक्कम सहज मिळवता येईल, तसेच 8.25% वार्षिक व्याजाचा लाभही चालू राहील.
सीबीटी बैठकीत केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया, राज्यमंत्री शोभा करंदलाजे, कामगार सचिव वंदना गुरनानी आणि EPFO आयुक्त रमेश कृष्णमूर्ती उपस्थित होते. बैठकीत शिक्षणासाठी पैसे 10 वेळा, लग्नासाठी 5 वेळा काढता येतील, यासह अंशतः पैसे काढण्याची कालमर्यादा 12 महिने निश्चित करण्यात आली आहे.

EPFO सदस्यांना आता कोणत्याही कारणाशिवाय पैसे काढता येणार आहेत, ज्यामुळे कागदपत्रांच्या ताणतणावाशिवाय रकमेचा आपोआप लाभ मिळेल. हा निर्णय नवीन कर्मचारी आणि EPF सदस्यांसाठी फायदेशीर ठरेल.या निर्णयामुळे आता सदस्य त्यांच्या भविष्य निधीवरील आर्थिक नियंत्रण अधिक सोपे आणि लवचिक प्रकारे करू शकतील, तसेच आपत्कालीन गरजांसाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी निधीचा वापर करता येईल.
हेही वाचा :
जर तुम्ही बोट घातलं तर….’, अमित ठाकरेंनी दिला जाहीर इशारा…
कुत्र्याची शिकार करायला घरात घुसला अन् उंदराला पाहताच पळत सुटला; भित्र्या वाघोबाचा मजेदार Video Viral
बाल संरक्षण गृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…