मुंबईत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत असून, दक्षिण मुंबईत एक भयानक प्रकार समोर आला आहे. तेथे एका २० वर्षांच्या गतीमंद मुलीवर(girl) सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. १७ जणांनी तिच्यावर अत्याचार केला आणि त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली.

५ महिने उलटून गेल्यानंतर ही भयानक घटना उघडकीस आली असून, त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. तर १७ जणांचे रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पीडित मुलगी(girl) २० वर्षांची असून ती मानसिकदृष्ट्या कमकुवत (गतीमंद) आहे. तिच्या वडिलांसोबत ती दक्षिण मुंबईत राहत होती. तिला ऐकू येत नाही आणि स्पष्ट बोलताही येत नाही. काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखू लागले होते. तिने आपल्या जवळील आजीला याबाबत सांगितले.
आजीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, धक्कादायक बाब समोर आली. वैद्यकीय तपासणीत ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर रुग्णालयाने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हे प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केली. पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यासाठी एका स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेण्यात आली. संस्थेच्या समुपदेशकांनी चित्रे आणि हातातील बाहुल्यांच्या मदतीने मानसशास्त्रीय पद्धतीने मुलीला बोलते केले.
जवळपास ५ दिवसांच्या संवाद प्रक्रियेनंतर, पीडित मुलीने(girl) वारंवार दोन व्यक्तींची नावे घेतली, ज्यामुळे हे भयानक सत्य समोर आले. मुलगी घरात एकटी असताना, काही नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आणि एका ३३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. समुपदेशकांशी बोलताना पीडित मुलीने आणखी १५ जणांची नावे सांगितली आहेत. त्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुनेघेऊन ते डीएनए पडताळणीसाठी पाठवले आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास (Further Investigation) वेगाने सुरू आहे.
हेही वाचा :
तान्या अमालच्या प्रेमात? केली किस…मालतीने केले आरोप, Video Viral
रश्मिका मंदान्नाने फ्लॉन्ट केली एंगेजमेंट रिंग, विजय देवरकोंडासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब?