दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित! अनेक दिवसांपासून रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपच्या(relationship) चर्चा सुरु होत्या आणि आता असं म्हटलं जातंय की या दोघांनी गुपचूप साखरपुडाही केला आहे.

अलीकडेच रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने या बातम्यांना अधिक जोर दिला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या पाळीव कुत्र्यासोबत थम्मा या तिच्या आगामी चित्रपटातील गाणं ऐकताना दिसत आहे. मात्र चाहत्यांचे लक्ष तिच्या हातातील डायमंड रिंगकडे गेले. या व्हिडीओत रश्मिकाने ती रिंग फ्लॉन्ट केल्याचं स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे चाहत्यांनी लगेचच अंदाज बांधला की ही तिच्या सगाईची रिंग आहे.
हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. काहींनी लिहिलं, “सारखपुडा कन्फर्म झाला!”, तर काहींनी म्हटलं, “फायनली आम्ही रिंग पाहिली!” आणखी एका चाहत्याने मजेशीर कमेंट केली, “हा संपूर्ण व्हिडीओ फक्त साखपुड्याची अंगठी दाखवण्यासाठीच होता!” या कमेंट्सवरून स्पष्ट होतं की चाहत्यांना रश्मिका आणि विजय यांच्या रिलेशनशिपबद्दल(relationship) प्रचंड उत्सुकता आहे.
रश्मिका मंदाना सध्या तिच्या थम्मा या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे, पण तिचं पर्सनल लाइफ सध्या जास्त चर्चेचा विषय बनलं आहे. काही अहवालांनुसार, रश्मिका आणि विजय यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक खासगी समारंभात साखरपुडा केला आहे. या सोहळ्यात फक्त दोघांच्या कुटुंबीय आणि जवळचे मित्रच उपस्थित होते.
रश्मिकेपूर्वी विजय देवरकोंडाही एका इव्हेंटदरम्यान आपल्या हातातील रिंग फ्लॉन्ट करताना दिसला होता. दोघांनी जवळपास एकाच काळात आपापल्या रिंग्स दाखवल्यामुळे चाहत्यांनी ही बातमी अधिक खरी मानली आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे आणि सर्वांना आता त्यांच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रश्मिका आणि विजय यांची जोडी दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण भारतात चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. दोघेही त्यांच्या अभिनयामुळे आणि नैसर्गिक व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. जर त्यांच्या साखरपुड्याची बातमी खरी ठरली, तर हे नक्कीच साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात चर्चित कपलपैकी एक ठरेल.
हेही वाचा :
तान्या अमालच्या प्रेमात? केली किस…मालतीने केले आरोप, Video Viral
ब्रेकिंग : पालिका निवडणुका रंगतदार होणार; जैन समाजाकडून ‘शांतीदूत जनकल्याण पक्षाची’ घोषणा