मुंबईतील कबुतर खान्याचा प्रश्न चर्चेत असतानाच आता जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा या नव्यापक्षाची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, आगामीकाळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाकडून(political party) उमेदवार दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पक्षाचे(political party) चिन्ह शांतीदून कबुतर असेल. येणाऱ्या काळात आमचा पक्ष फक्त कबुतरांसाठीच नव्हे तर, गोमातासह प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आमचा पक्ष काम करेल असेही जैन मुनींनी यावेळी स्पष्ट केले. हा पक्ष राजकीय पक्ष नसेल तर, भगवान महावीर यांचा पक्ष आहे.
कबुतरांविरोधात जे आहेत त्यांच्यांशी आमचा वाद आहे. हा पक्षफक्त जैनांचा पक्ष नाहीये. राजस्थान 36 कोम यात जेवढेपण मारवाडी गुजराती असेल ते सगळे एक होऊन आम्ही आमचे उमेदवार उभे करू असे जैन मुनींनी जाहीर केले. यावेळी त्यांनी शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरण्याचेही आवाहन केले. शिनसेना वाघाच्या नावावर चालू शकते तरस जैन समाज शांतीदूतच्या नावावर पक्ष का नाही अस्तित्वात येऊ शकत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी कोणत्याही पक्षाचा विरोधक नसून, महाराष्ट्रात मी फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांनाच मानतो. ज्यांनी फडणसांना मानले मी त्यांनाच मानतो असेही जैन मुनींनी सांगितले. बाकी कोणत्याच नेत्यांना ओळखत नाही.
हेही वाचा :
“हनी ट्रॅप’ च्या ट्रॅक मध्ये जेव्हा आमदारच अडकतो!
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी
बायकोचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला, महिलेसोबत…