कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : माहिती आणि तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याच्याजवळ जाणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्याच्यापासून सावध किंवा सतर्क राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरात आले आहे. त्यातून आभासी वातावरण तयार करता येते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारची”मय सभा”आहे. जे समोर दिसते पण प्रत्यक्षात तसे नसते. एखाद्याला हनी ट्रॅप च्या(honey trap)ट्रॅक मध्ये आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ लागला आहे.

आयटीने विकासाच्या खिडक्या जश्या उघडल्या गेल्या आहेत तशाच प्रकारे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासाठी दारे सुद्धा उघडली जाताना दिसतात. हनी ट्रॅपच्या(honey trap) ट्रॅक मध्ये चंदगडचे अपक्ष व भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिवाजीराव पाटील यांनाच अडकवण्याचा झालेला प्रयत्न भयंकर आहे. लोकप्रतिनिधीच”शिकार”होत असेल तर सामान्य लोकांचे काय? मोबाईल हा माणसाचा अविभाज्य घटक बनला आहे. तो गरज बनला आहे. अनेकदा त्याची “असून अडचण आणि नसून खोळंबा”अशी अवस्था झाली आहे. खोटे बोलण्याचे यंत्र म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.

आपण घरीच असतो आणि या यंत्राच्या माध्यमातून “मी जरा बाहेर आहे” असेच खोटेच सांगतो. सध्या बहुतांशी लोकांच्याकडे स्मार्टफोन आहे. अनेकांच्या खिशात सध्या महागडा”आय फोन”सुद्धा आहे. फोन मध्ये कितीतरी प्रकारची ॲप्स असतात. फेसबुक, इंस्टाग्राम, वगैरे ॲप आहेत. आणि असतातच. त्यातून अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. केल्या जात असतात. या ॲपच्या माध्यमातून फनी रिल्स पाहायला मिळतात. याशिवाय अनेक प्रकारची माहिती मिळत असते.

फेसबुक किंवा instagram वर”नीड ओल्ड मन” किंवा “नीड फ्रेंड्स”अशा प्रकारच्या रिक्वेस्ट येत असतात. माझे वय 50 आहे, मला पुरुष हवा आहे. मी विधवा आहे, मला एका विश्वासू साथीदाराची गरज आहे किंवा माझे वय 40 आहे आणि एका चांगल्या मित्राची गरज आहे अशा प्रकारच्या या रिक्वेस्ट असतात आणि अशा प्रकारच्या रिक्वेस्ट करणाऱ्या महिला आपले रंगीत फोटो फेसबुकवर देत असतात. बहुतांशी महिला या अतिशय मादक, सुंदर असतात.

बऱ्याचदा त्या अर्ध नग्न ही असतात. अशा स्त्रियांची रिक्वेस्ट मान्य करणे हे धोक्याचे असते. किंबहुना या स्त्रियांच्या कडून केलेला हा हनी ट्रॅप(honey trap) असतो. येथूनच संबंधितांना इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात होते. सुरुवातीला संबंधित स्त्री बरोबर चॅटिंग केली जाते. तिच्याकडूनही तत्परतेने प्रतिसाद दिला जातो. या चॅटिंगचे रूपांतर मैत्रीत होते. आणि नंतर ते नको त्या वळणावर येऊन पोहोचते.

चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील हे अशाच प्रकारे हनी ट्रॅप मध्ये अडकलेले दिसतात. त्यांची त्या स्त्रीशी अशीच फेसबुक वर ओळख झालेली आहे. त्या ओळखीचा गैरफायदा तिने घेतलेला दिसतो. त्या स्त्रीने त्यांच्याकडून अधून मधून रोख पैसे उकळले आहेत. शिवाजीराव पाटील हे आमदार आहेत याचा अर्थ ते श्रीमंत आहेत.

चारित्र्यहनन करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून भरपूर माया गोळा करता येईल असा विचार करून तिने चक्क दहा लाख रुपयांची खंडणीच मागितली. आता मात्र आपल्या नाका तोंडात पाणी जायची वेळ आली आहे हे लक्षात आल्यानंतर आमदार पाटील यांनी ठाणे शहरातील एका पोलिसांनी रीतसर फिर्याद दिली. आपण हनी ट्रॅप मध्ये सापडलो होतो हे सांगण्याचे सुद्धा आणि पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे सुद्धा धाडस लागते. आमदार शिवाजीराव पाटील यांनी हे धाडस दाखवले. ठाणे पोलिसांकडून त्या अज्ञात स्त्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

 वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला

40 लाख नव्या नोकरीच्या संधी,

‘मला तुझी बायको दे त्याबदल्यात तुला…’ प्रियकराने ठेवली पतीसमोर धक्कादायक अट, Viral Video