युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीसंबंधित अनेक गंभीर(infection) समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे लघवीमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक ताण, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव शरीरात निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे महिलांसह पुरुष सुद्धा दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरातील विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात. दिवसभरात बऱ्याचदा लघवीला जावे लागते. पण लघवीमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे इत्यादी समस्या सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करणे आवश्यक आहे. लघवीत होणारे बदल आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत दर्शवतात.

आरोग्यासंबंधित गंभीर आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब,किडनी इन्फेक्शन किंवा लिव्हरसबंधित समस्या उद्भवतात.आज आम्ही तुम्हाला लघवीमध्ये दिसून येणारे बदल कोणत्या आजाराची लक्षणे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात हे बदल दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वारंवार लघवीला होणे:

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर वारंवार लघवीला होते. याशिवाय खूप जास्त तहान लागल्यामुळे पाण्याचे सेवन केले जाते. मात्र त्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचते. केवळ मधुमेहामुळेच नाहीतर युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागतात. यूटीआय इन्फेक्शन वाढण्यामागे अनेक कारण आहेत. अतिप्रमाणात चहा कॉफीचे सेवन, दारू जास्त प्यायल्यामुळे सतत लघवीला जावे लागते.

लघवीच्या रंगात बदल होणे:

डिहायड्रेशन, लिव्हर डिजीज, काविळ, जास्त घाम येणे किंवा विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे लघवीचा रंग अतिशय गडद होऊन जातो. लघवी करताना असह्य वेदना होतात. लघवीचा रंग जर लाइट किंवा पारदर्शक असेल तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.तर काहीवेळा मधुमेह आणि किडनी निकामी झाल्यानंतर सुद्धा लघवीच्या रंगात अतिशय गंभीर बदल दिसून येतात.

लघवीतून रक्त येणे:

शरीरात युरीन इन्फेक्शन वाढल्यानंतर लघवीमधून काहीवेळा रक्त येते. लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. स्टोन, इन्फेक्शन किंवा किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर लघवीमधून रक्त येते. याशिवाय कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतरसुद्धा लघवीमधून अचानक रक्त येणे.

हेही वाचा :

नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार