गुडघ्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय(pain) करावेत. हाडांना तेलाने मसाज केल्यास हाडांमधील वेदनांपासून आराम मिळेल. जाणून घ्या गुडघे दुखीवरील घरगुती उपाय.

हल्ली धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शारीरिक थकवा, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव(pain) इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात पोषणाचा अभाव निर्माण झाल्यानंतर हाडांमधील वेदना वाढू लागतात. पूर्वीच्या काळात वयाच्या ६० किंवा ७० वर्षानंतर हाडांमध्ये वेदना किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत होत्या. मात्र हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम तरुण वयातच आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देऊन शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. कमी हालचाल, जास्त बसून राहणे, वजन वाढणे आणि चुकीच्या सवयींमुळे तरुण वयातच हाडांमध्ये वेदना वाढत आहेत.

गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदनांमुळे पायऱ्या उतरताना, चढताना, खाली वर करताना खूप जास्त वेदना होतात. या वेदना अतिशय तीव्र झाल्यानंतर चालणे सुद्धा कठीण होऊन जाते. सांध्यांमधी झीज झाल्यामुळे आणि घर्षणामुळे हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. गुडघ्यांवर दिलेला अतिरिक्त तणाव, विटामिन डी, विटामिन बी १२ ची कमतरता, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वेदना वाढू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळेल आणि गुडघे दुखी कमी होईल.

गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

दिवसांतून एकदा गरम पाण्याचा एक मिनिटं शेक घ्यावा. यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात. याशिवाय स्नायूंना आराम मिळतो, रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात. याशिवाय वारंवार गुडघ्यांना सूज येत असेल तर थंड पाण्याचा शेक घ्यावा. यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील आणि कायमचा आराम मिळेल. हल्ली गरम पाण्याचा वापर कोणीही करत नाही. पण आरोग्यासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी गरम पाणी अतिशय प्रभावी ठरते.

दैनंदिन आहारात खाल्ले पौष्टिक पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे नियमित सेवन करावे. हळदीचे दूध, तीळ, बदाम, हिरव्या भाज्या आणि दूध इत्यादी पदार्थ आहारात समावेश केल्यास हाडांमधील कमी झालेले कॅल्शियम वाढेल आणि हाडांची झीज होणार नाही. याशिवाय नियमित हलकासा व्यायाम करावा, स्ट्रेचिंग करावा. ताडासन, त्रिकोणासन किंवा पवनमुक्तासन केल्यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

हेही वाचा :

5 शेअर्सवर 3 नवीन शेअर्स मोफत,
शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!
देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात