केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे विधान केले आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार, लवकरच ईव्ही कार(electric car) सर्वसामान्यांच्या पोहोचीत येतील, आणि ४ ते ६ महिन्यांत त्यांची किंमत पेट्रोल कारसमान होईल. त्यांनी हे वक्तव्य २०व्या FICCI हायर एज्युकेशन समिट २०२५ मध्ये केले.गडकरी म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि सरकारच्या ई-मोबॅलिटी धोरणांमुळे ईव्ही वाहनांचे खर्चात मोठी कपात झाली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे आणि आता वाहन खरेदीदारांसाठी ईव्ही खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे.

त्यांच्या मते, भारत दरवर्षी पेट्रोल आयातीवर २२ लाख कोटी रुपये खर्च करतो, जे देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा भार देते. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती खरेदी प्रदूषण कमी करण्यास, गंगाजळी वाचवण्यास आणि इंधनावरील खर्च वाचवण्यास मदत करेल. गडकरी यांनी भारताच्या ऑटो उद्योगातील प्रगती देखील अधोरेखित केली. जेव्हा त्यांनी मंत्रालयाचा कारभार हाती घेतला, तेव्हा ऑटो उद्योगाची किंमत १४ लाख कोटी रुपये होती; आता ती २२ लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. पाच वर्षांत उद्योगात मोठी झेप झाल्याचे ते म्हणाले.
गडकरींच्या मते, येत्या पाच वर्षांत भारत जगातील ऑटो सेक्टरमध्ये नंबर वन बनण्याच्या मार्गावर आहे. सध्या अमेरिका ७८ लाख कोटी आणि चीन ४७ लाख कोटी रुपयांसह आघाडीवर आहेत, पण भारताच्या उद्योगात भारी वाढ अपेक्षित आहे.या घोषणेने ईव्ही मार्केट आणि शेअर्सवर रॉकेटसारखी भरारी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे(electric car).
हेही वाचा :
टीम इंडियासाठी गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू दुखापतीनंतर परतण्यासाठी सज्ज..
‘Kantara Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
काही दिवसांनी मसाल्यांचा सुगंध निघून जातो? मग असे साठवा मसाले