36 वर्षीय महिलेवर आरोपीने तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.(hands) न्यूयॉर्क शहरातील नॉरवुड येथे ही घटना घडली असून, आरोपी बेघर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 5 वाजता घडली जेव्हा पुटनम प्लेसजवळील ईस्ट गन हिल रोडवरील एका निवासी इमारतीत 21 वर्षीय तरुणाने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

द न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, आरोपी केनेथ सिरिबोने एका हाताने महिलेचे तोंड बंद केलं आणि दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबला. त्यानंतर त्याने महिलेला जमिनीवर ढकलले आणि तोंडावर एकामागोमाग अनेक बुक्क्या मारल्या. यानंतर तो तिच्या अंगावर बसला आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. (hands)यादरम्यान पीडित त्याच्याकडे हात जोडून अत्याचार थांबवण्यासाठी विनंती करत होती. हे अत्याचार थांबवण्यासाठी तुला किती पैसे हवेत अशी विचारणा ती करत होती.

“नको नको, कृपया थांबं! तू थांबण्यासाठी मी तुला नेमके किती पैसे देऊ?,” अशी विनवणी पीडित महिला करत असल्याचं न्यायालयात दाखल कागदपत्रांमधून उघड झालं आहे. हल्ल्यानंतर, त्याने तिची पर्स आणि पाकीट हिसकावून घेतलं ज्यामध्ये 250 डॉलर्स रोख होते. यानंतर तिचं ओळखपत्र आणि तिच्या चाव्या घेऊन इमारतीतून पळून गेला.(hands)नंतर, न्यूयॉर्क पोलिसांनी व्हिडिओ फुटेज जारी केलं आहे ज्यामध्ये आरोपी इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली पळत असताना दिसत आहे. यावेळी तो आपली पँट सांभाळत असून, गळ्यात टॉवेल घातल्याचं दिसत आहे.

महिलेच्या शरिरावर जखमा, सूज आहेत. तिला नॉर्थ सेंट्रल ब्रॉन्क्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त न्यूयॉर्क डेली न्यूजने दिलं आहे. सिरिबोने पीडितेच्या इमारतीत प्रवेश कसा केला याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी, रिपोर्टनुसार तो बराच काळ तिथेच होता. सोमवारी त्याला पीडितेच्या घरापासून सुमारे दोन मैल अंतरावर असलेल्या ब्रॉन्क्सच्या दुसऱ्या इमारतीतून अटक करण्यात आली. (hands)त्याच्यावर बलात्कार, दरोडा, घरफोडी, चोरी असे अनेक गंभीर आरोप आहेत. सोमवारी संध्याकाळी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी 30,000 डॉलर्सवर जामीन निश्चित केला.

जुलैच्या सुरुवातीला, न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेणाऱ्या 26 वर्षीय थाई मॉडेलवर ब्रुकलिन सबवे स्टेशनवर जामिनावर बाहेर असलेल्या एका गुन्हेगाराने क्रूरपणे हल्ला केला आणि लुटमार केली. (hands)विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत ब्रॉन्क्समध्ये 399 बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. 2024 मध्ये याच कालावधीत NYPD ने नोंदवलेल्या 314 हल्ल्यांच्या तुलनेत 27 टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला