कोरिओग्राफर(Choreographer) धनश्री वर्मा सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी आहे, जिथे ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलासे करत आहे. शो दरम्यान, तिने युजवेंद्र चहलसोबतच्या नात्याबाबत अनेक आरोप केले, त्यात तिने दावा केला की, लग्नाच्या दुसऱ्या महिन्यांतच चहलने तिची फसवणूक केली. या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली.

अशा परिस्थितीत, युजवेंद्र चहलने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना आपल्या बाजू स्पष्ट केली. त्याने सांगितले, “मी एक खेळाडू आहे आणि मी कधीही चीट केलेलं नाही. जर मी दोन महिन्यांतच चीट केलं असतं, तर आमचं रिलेशनशिप इतके वर्ष टिकलं असतं का? माझ्यासाठी धनश्री नावाचा चॅप्टर संपलाय. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलोय आणि इतरांनीही जावं. सध्या मी सिंगल आहे आणि लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही. मी फक्त माझ्या आयुष्यावर आणि खेळावर लक्ष केंद्रीत करतोय.”
धनश्रीने(Choreographer) शोमध्ये कुब्रा सैतशी बोलताना सांगितले की, “लग्नानंतर दुसऱ्या महिन्यात मला समजलं की, युजवेंद्रसोबतचं माझं नातं टिकणार नाही. मला लग्नाच्या सुरुवातीसच धोका जाणवला.” अर्जुन बिजलानीशी संवादात तिने सांगितले की, “युजवेंद्र चुकीचा असतानाही मी त्याला अनेकदा पाठिंबा दिला, कारण मला नातं जपायचं होतं.”

धनश्री आणि युजवेंद्रचे लग्न 2020 मध्ये मोठ्या थाटात झाले होते आणि गेल्या वर्षी त्यांना चार वर्षांची विवाहिक जीवनाची नोंद झाली. त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात युजेंद्रच्या डान्स शिकण्यासाठी धनश्रीला संपर्क करण्यापासून झाली होती. सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. या प्रकरणामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गडबडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा :
भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ….
अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं…बैठकीत नेमकं काय घडलं?
डी के एस सी मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस संपन्न…