बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना रोहित शर्माच्या जागी युवा शुबमन गिलला एकदिवसीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी दिली. या निर्णयानंतर रोहितच्या विश्वासू खेळाडू वरुण चक्रवर्तीला वनडे संघातून वगळण्यात आले. वरुणने भारताला काही महिन्यांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती(Team India).

वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीतील तीन सामन्यांत 15.11 अशा बॉलिंग एव्हरेजने 9 विकेट्स घेतल्या, त्यापैकी 5 विकेट्स एकाच सामन्यात मिळवल्या होत्या. त्याच्या या कामगिरीसाठी मुंबईतील सीएट अवॉर्ड शोमध्ये वरुणला ‘इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना वरुणने रोहित शर्माचे आभार मानले आणि विजयासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

वरुणने ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे टीममध्ये स्थान गमावले असले तरी, त्याला टी 20i मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी 20i मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत वरुणच्या गोलंदाजीवर भारतीय संघाची अपेक्षा वाढली आहे(Team India).

हेही वाचा :

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत
दूषित पाण्याचा कहर….
सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता