शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 वर्षीय चिमुकलीवर स्कूल केअरटेकरकडून बलात्कार, आरोपी जामीनावर बाहेर

चिमुकल्यांवर होणाऱ्या बलत्काराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशीच एक घटना दिल्लीतील खासगी शाळेत घडून आली आहे. धक्कादायक म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला जामीनावर मुक्त करण्यात आलं आहे.

महिलांवरील बलात्काराची प्रकरणे वाढत असून अलिकडे लहान मुलींचेही आयुष्य यात अडकत असल्याचे समोर येत आहे. मागील काही काळापासून नराधमांकडून चिमुकल्या लहान मुलींवरही लैंगिक अत्याचार केला जात आहे. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली असून यात आणखी एका घटनेचा समावेश झाला आहे. ही घटना दिल्लीतील जनकपुरी येथे घडून आल्याची माहिती आहे. ३ वर्षीय चिमुकली पहिल्याच दिवशी शाळेत गेली असता शाळेतील कर्मचाऱ्याने तिच्यासोबत हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, ही घटना १ मे रोजी शाळेतच घडली. आरोपी ५७ वर्षांचा पुरुष असल्याचे समोर येत आहे. मुलीच्या आईला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिने पोलिस ठाण्याच मुलीच्या न्यायासाठी तक्रार दाखल केली. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, शाळेच्या एका कर्मचाऱ्याने तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तक्रारीनुसार, मुलीने दाखला मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेत ३० एप्रिल रोजी हजेरी लावली. शाळेतून घरी येताच तिने आपल्या आईला तिला वेदना होत असल्याचे सांगितले. मुलीला सविस्तर विचारल्यानंतर तिने सांगितलं की तिला शाळेच्या एका निर्जन जागी नेण्यातं आलं होतं जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

आईच्या आरोपांची दखल घेत पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला. (3-year-old girl) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीकडून आरोपीची ओळख पटवून घेण्यात आली ज्यानंतर ५७ वर्षीय केअरटेकरला ताब्यात घेण्यात आलं. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं जिथे त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीला पकडलं पण त्याला फार काळ शिक्षा देता आली नाही कारण ७ मे रोजी द्वारकाच्या न्यायालयात आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला ज्याच्या जोरावर तो पोलिस कोठडीतून बाहेर देखील निघाला.

आरोपीला जामीन मिळताच आता मुलीच्या आईने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने आरोप लावले की, तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. तिनेही हे देखील उघड केले की, यात शाळेतील एक शिक्षक देखील सामील होता ज्याची पोलिस तपासात चाैकशी करण्यात आली. (3-year-old girl) त्यांनी एका निवेदनात म्हटले की, “कल्पना करा की, एका मुलीचे नर्सरी स्कूलमध्ये नाव दाखल केले जाते आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी घरी येऊन तिच्या आई-वडिलांना समजते की तिच्यावर ५७ वर्षीय केअरटेकरने बलात्कार केला आहे”.

दरम्यान मुलीच्या आईने केलेल्या सर्व आरोपांना फेटाळत पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिक पुरावे, न्यायवैद्यक तपासणी, साक्षीदारांचे जबाब आणि प्रकरणातील तथ्यांच्या आधारे निष्पक्ष, व्यावसायिक आणि तटस्थ पद्धतीने तपास करण्यात आला आहे.(3-year-old girl) परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी फक्त कायदेशीर चाैकशीच्या आधाराने नाही तर विचारविनिमयाने घटनेचा तपास करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले. सरकारी पक्षाने न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. तथापि, न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला असेही पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेनंतर न्यायालयीन प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक प्रकरणांनुसार या प्रकरणातही न्याय अपूराच राहिलं का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी