तासगाव तालुक्यातील वायफळे येथील जवान विशाल सदाशिव घोडके (वय 32) यांचे देशसेवेत असताना शनिवारी निधन झाले. कानपूर येथे सेवा बजावत असताना(jawan) त्यांची प्राणज्योत मालवली.

घोडके त्यांचे वडील सदाशिव घोडके यांनी अनेक वर्षे सैन्य दलात सेवा बजावली आहे. (jawan) तसेच त्यांचे मोठे बंधू विनोद घोडके हेही गेल्या अनेक वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत आहेत. दिवस-रात्र अथक् परिश्रम घेत अखेर वयाच्या अवघ्या 18-19 व्या वर्षी त्यांची सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर तब्बल 13 ते 14 वर्षे त्यांनी देशसेवेत स्वतःला वाहून घेतले.
सध्या ते कानपूर येथे सैन्य दलाच्या युनिटमध्ये कार्यरत होते. शनिवारी सकाळी कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. विशाल यांच्या निधनामुळे गावाने एक कर्तव्यदक्ष जवान गमावला असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. (jawan) त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी, विवाहित भाऊ व तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. विशाल घोडके यांचे पार्थिव सोमवारी सकाळी वायफळे येथे आणण्यात येणार असून त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?