लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे एकूण ३००० रुपये जमा झाले असून, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Ladki Bahin) यामुळे आपला हप्ता बंद झाला आहे का, अशी शंका अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र, लाभार्थी महिलांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्जाची स्थिती तपासता येणार आहे.

मार्च महिन्याचा हप्ता काही कारणांमुळे रखडला होता. त्यामुळे आता मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जात आहेत. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा न होण्यामागे विविध कारणे असू शकतात.योजनेअंतर्गत सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील केवळ एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळतो. (Ladki Bahin) तसेच सरकारी सेवेत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.

याशिवाय आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, केवायसी पूर्ण न करणे किंवा अर्जातील माहिती अपूर्ण असणे, ही लाभ बंद होण्याची प्रमुख कारणे ठरू शकतात. विशेष म्हणजे, केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा महिलांचा लाभ थांबविण्यात आला आहे. (Ladki Bahin) त्यामुळे लाभार्थींनी तातडीने आपली कागदपत्रे आणि अर्जाची स्थिती तपासून आवश्यक पूर्तता करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात

ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?