मोबाईलवरील रील्स ठरले वादाचे कारण आठ वर्षांच्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसर हादरला

मोबाईलचा वाढता वापर लहान मुलांच्या वर्तनावर कसा परिणाम करू शकतो, याबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात मोबाईलवर रील्स पाहण्यावरून मोठ्या बहिणीशी वाद झाल्यानंतर आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ३ नोव्हेंबर रोजी डुंगरपुरवा गावात ही घटना घडली. (mobile phones) घटनेच्या वेळी मुलाचे आई-वडील घरी नव्हते. याबद्दलचे सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

रील्स पाहण्यावरून बहिणीशी वाद मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आठ वर्षांचा मुलगा आपल्या बहिणीसोबत मोबाईलवर रील्स पाहत होता. त्याची बहीण त्याच्यापेक्षा साधारण दीड वर्षाने मोठी आहे. मोबाईल वापरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. (mobile phones) त्यानंतर मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनीही मोबाईलवरून झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे. घटनेची माहिती मिळताच कुठौंद पोलीस ठाण्याचे पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. जालौनचे सर्कल ऑफिसर अजय कुमार सिंह यांनीही गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवालाची प्रतीक्षा आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सर्कल ऑफिसर अजय कुमार सिंह यांनी लहान मुलांमध्ये वाढत (mobile phones) असलेल्या मोबाईलच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. मुलं किती वेळ मोबाईल वापरतात आणि त्यावर नेमकं काय पाहतात, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांमध्ये मोबाईल वापराबाबतची समज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया यांचाही विचार करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाइमवर मर्यादा ठेवण्याबरोबरच त्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा