सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य रेल्वेने १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत तिकीटाची वैधता आणि सत्यता तपासण्यावर विशेष भर दिला जाणार असून सवलतीच्या तिकिटांवर, ठराविक आरक्षण कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तसेच रेल्वे पासच्या आधारे प्रवास करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Railway) सवलत किंवा आरक्षण कोट्याचा लाभ घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे. एका पीएनआरवर अनेक प्रवाशांची तिकिटे बुक असल्यास त्या तिकिटावर नोंद असलेल्या किमान एका प्रवाशाकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करता न आल्यास नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणारे मानले जाऊ शकते.
या विशेष मोहिमेदरम्यान रेल्वेचे तिकीट तपासणी कर्मचारी सवलतीच्या तिकिटांसह आरक्षण कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कागदपत्रे तपासणार आहेत. E-Pass किंवा PTO द्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. (Railway) तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी E-Pass किंवा PTO वर प्रवासासाठी आवश्यक प्रक्रिया आणि अधिकृत बदल पूर्ण झाले आहेत की नाही, याची खात्री करणे आवश्यक राहणार आहे.
अनारक्षित तिकिटांचीही या मोहिमेत तपासणी केली जाणार असून तिकिटाची वैधता पडताळण्यासाठी गरजेनुसार तिकीट तपासणी कर्मचारी TTE App चा वापर करू शकतात. आरक्षण सुविधेचा गैरवापर, सवलतींचा आणि रेल्वे पासचा चुकीचा वापर (Railway) तसेच बनावट किंवा अवैध तिकिटांमुळे होणारे रेल्वेच्या महसुलाचे नुकसान रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. रेल्वे प्रवासासाठी मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाचे फोटो स्टुडंट आयडी, फोटो असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, बँकेचे लॅमिनेटेड फोटो क्रेडिट कार्ड आणि आधार कार्ड यांसारखी ओळखपत्रे वापरता येणार आहेत.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की