आधी मुंडन, नंतर जबरदस्तीनं शेण चारलं; चिखलात बसवून जमावाकडून २ तरूणांना मारहाण viral video

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील एका गावातून समोर येत आहे.(humanity) एका जमावाने दोन तरूणांशी असभ्य वर्तन केलं आहे. सर्वात आधी त्यांनी तरूणांचे केस कापले, नंतर त्यांना शेण खायला दिलं. त्यांचा अपमान करण्यासोबतच त्यांना अमानुष मारहाणही केली. मात्र, यामागील अद्याप कारण समोर आलेले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारे तरूण मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका गावातील असल्याची माहिती आहे. दोन्ही तरूणांसोबत अमानुष प्रकार रात्रीच्या सुमारास घडला.(humanity) दोन तरूणांभोवती अनेक लोक बसलेले असल्याचं दिसत आहे. उपस्थित लोकांनी यादरम्यान, मोबाईल फोनचा टॉर्च चालू ठेवला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही तरूणांना अर्धनग्न करून आधी जमिनीवर चिखलात बसवतात. नंतर दोन पुरूष एकत्र एका तरूणाचे मुंडन करताना दिसत आहे. यादरम्यान, व्हिडिओमध्ये आवाज ऐकू येत आहे. मुंडन केल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाईचे शेण खायला देण्यात आले आहे. (humanity)उपस्थित असलेल्या काहींनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.दरम्यान, या अमानुष वागणुकीबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास कुणीही पुढाकार घेतलेला नाही. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अमानुष प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

मध्यपूर्वेतील संघर्ष थांबला शस्त्र संधी कायमची टिकेल?

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात सुरू होणार सी-प्लेनची सुविधा

कनवाड येथे कृष्णा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या ११ एकर शेतीची आमदार यड्रावकर यांच्याकडून पाहणी – तातडीने पंचनाम्याचे आदेश