BCCI च्या नव्या निर्णयामुळे ‘या’ स्टार खेळाडूला 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी

इंग्लंडचा स्टार क्रिकेटर आणि टेस्ट कर्णधार बेन स्टोक्स आयपीएलमध्ये(cricket exchange) नेहमी एक महत्वाचा खेळाडू असतो. या ऑल राऊंडर खेळाडूने आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, इजिंग पुणे सुपर जायंट्स तसेच चेन्नई सुपर किंग्स सारख्या टीमकडून खेळत असताना महत्वाची कामगिरी केलेली आहे.

मात्र मागील काही वर्षांपासून स्टोक्स दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे आयपीएलमध्ये(cricket exchange) खेळत नव्हता. तसेच यंदाही त्याने आपलं नाव आयपीएल मेगा ऑक्शनसाठी नोंदवलेलं नाही.

2025 च्या आयपीएल मेगा ऑक्शनसाठी बेन स्टोक्सने नाव न नोंदवल्यामुळे बेन स्टोक्सला आता आयपीएल 2026 च्या सीजनमध्येही खेळता येणार नाही. केवळ बेन स्टोक्सनेचं नाही तर फलंदाज जो रूटने देखील आपले नाव मेगा ऑक्शनसाठी नोंदवले नाही त्यामुळे त्याला सुद्धा असाच फटका बसणार आहे.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आयपीएल ऑक्शनमध्ये समाविष्ट झालेल्या 1574 खेळाडूंची यादी जाहीर केली. यात अनेक दिग्गज क्रिकेटर्स सह युवा खेळाडूंचाही समावेश होता. मात्र यात स्टोक्स आणि जो रूटचे नाव नव्हते. बीसीसीआयने नुकताच असा नियम केला आहे की, जर कोणताही परदेशी खेळाडू मेगा लिलावापासून दूर राहिला तर तो पुढच्या वर्षीही लिलावातून बाहेर राहील.

बीसीसीआयने हा नियम यासाठी केलाय कारण काही विदेशी खेळाडू स्वतःला मेगा ऑक्शनपासून दूर ठेवतात आणि त्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये भाग घेऊन लीगमधून मोठी रक्कम घेऊन जातात.

स्टोक्सने असे यापूर्वी देखील केले असून तो 2022 मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनचा भाग नव्हता आणि मग 2023 मध्ये झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये सहभागी झाला. बेन स्टोक्सने मिनी ऑक्शनमध्ये येऊन 16.25 कोटी रुपये कमावले होते. यावेळी चेन्नईने त्याला आपल्या संघात घेतलं होतं.

बेन स्टोक्सने आयपीएल सीजन 2017 मध्ये पहिल्यांदा पदार्पण केले होते, यावेळी त्याला पहिल्यांदा राइजिंग पुणे सुपर जायंट्सने 15.25 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले होते. त्यावेळी बेन स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला. परंतू आता 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये भाग न घेण्याचा निर्णय त्याच्यावर भारी पडला असून आता आयपीएल 2027 च्यापूर्वी तो लीगमध्ये भाग घेणार नाही.

हेही वाचा :

राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe

लग्नाच्या सुरुवातीला कधीच करु नका ‘या’ 5 गोष्टी, नात्यांमध्ये येऊ शकतो दुरावा

लसूण 500, कांदा 80… भाज्यांचे भाव कडाडले, सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची फोडणी