सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न सर्वच महिलांना(breakfast) सतत पडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट कोथिंबीर पराठा बनवू शकता. हा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो.

सकाळच्या वेळी नेहमीच पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने नाश्ता करणे टाळतात. पण सकाळच्या(breakfast) वेळी नाश्ता केल्यामुळे वजन कायमच नियंत्रणात राहते. सकाळच्या वेळी नेहमीच पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही १० मिनिटांमध्ये झटपट कोथिंबीर पराठा बनवू शकता. लहान मुलांसह मोठ्यांना कोथिंबीर खायला आवडत नाही. पण कोथिंबीर खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यापूर्वी तुम्ही बटाट्याचा पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा किंवा पनीर पराठा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.
साहित्य:
कोथिंबीर
गव्हाचं पीठ
मीठ
आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट
लाल तिखट
हळद
धणे
ओवा
जिऱ्याची पावडर
तूप
शिमला मिरची खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये(breakfast) भाजलेल्या शिमला मिरचीपासून बनवा चमचमीत चटणी
कृती:
कोथिंबीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरा.
मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, एक चमचा तांदळाचे पीठ, हळद, लाला तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
त्यानंतर त्यात आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट , बारीक कुसकरून घेतलेले धणे, ओवा आणि जिऱ्याची पावडर घाला.
तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून पराठ्याचे पीठ मळून घ्या आणि थोडेसे तेल लावून ठेवा.
तयार केलेल्या पिठाचे गोळे करून पराठा लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर पराठा
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय