बाबर आझमने अफ्रिकेविरुद्ध चांगली फलंदाजी करीत दमदार 81 धावांचे योगदान दिले आऊट होत नसल्याने रागावलेल्या गोलंदाजाने फारच विचित्र कृत्य केल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तान क्रिकेट(cricket) संघाचा माजी कर्णधार बाबर आझम दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज विआन मुल्डरच्या थ्रोमुळे जखमी झाल्याने चांगलाच संतापला.
केपटाऊन कसोटीत घडलेल्या या घटनेत अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. भरमैदानात असा प्रकार घडल्याने सर्वच जण चक्रावून गेले अन् काहीकाळ वातावरण चांगलेच तंग झाल्याचे पाहायला मिळाले.
केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या न्यूलँड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात बाबर आझम चांगली फलंदाजी करताना दिसला. 81 धावांची इनिंग खेळून तिसऱ्या दिवशी तो बाद झाला. या खेळीदरम्यान तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वियान मुल्डरशी भिडला. फॉलोऑन दिल्यानंतर बाबरने कर्णधार शान मसूदच्या साथीने २०५ धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवित केल्या.
पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर(cricket)आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावलेल्या संघाला दुसऱ्या सामन्यात फॉलोऑन खेळावा लागला. यजमान संघाने पहिल्या डावात रायन रिकेल्टनचे द्विशतक आणि कर्णधार टेंबा बावुमाच्या शतकाच्या जोरावर ६१५ धावांचा डोंगर उभा केला.
Fight moment between Babar Azam and Wiaan Mulder.
— Ahtasham Riaz (@ahtashamriaz22) January 5, 2025
Wiaan Mulder unnecessary throws the ball at Babar Azam & showing him verbal aggression. #BabarAzam #PAKvsSA #SAvPAK pic.twitter.com/PZnPNTWELZ
तिसऱ्या दिवसाच्या खेळात पाकिस्तानचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या 194 धावांवर गारद झाला. फॉलोऑनला येत असताना, दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 1 गडी बाद 213 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज वियान मुल्डरच्या थ्रोवर जखमी झाल्याने बाबर आझम चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. आला.
हेही वाचा :
‘अजितदादांनी असं बोलू नये’; छगन भुजबळ यांनी ‘त्या’ विधानावर दिला सल्ला
“चीनमधील HMPV विषाणूचा संकट, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान”
एक चूक अन्…! धावत्या बसमध्ये चढण्याचा तरुणीचा खतरनाक स्टंट; Video Viral