200 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

दर महिन्यात महागड्या रिचार्ज(recharge) प्लॅन्सच्या खर्चामुळे टेन्शन आलं आहे का? असं असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला काही खास प्लॅन्सची माहिती देणार आहोत. खास यासाठी की हे प्लॅन्स तुम्हाला अगदी 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकतील.

तुम्ही Jio, Airtel, Vi किंवा BSNL या कोणत्याही दूरसंचार कंपनीचे युजर्स असाल तरी ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही सांगत असलेल्या स्वस्त रिचार्ज(recharge) प्लॅन्समध्ये तुम्हाला 2GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएसची सुविधा मिळू शकेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Airtel चा 379 रुपयांचा प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅन आहे. Airtel तुम्हाला या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा देत आहे. 379 रुपयांचा हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 2GB यासह अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, स्पॅम कॉल आणि मेसेज अलर्ट आणि फ्री हॅलोट्यून्स सारखे फायदे आहेत.

रोज 2 GB डेटा असणारा जिओचा हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. 198 रुपायांच्या या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज 2 GB डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अ‍ॅक्सेस यासारखे फायदे आहेत.

व्होडाफोन आयडियाचा हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. यात रोज 2 GB डेटा मिळतो. 365 रुपयांचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये रोज 2 GB डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये अर्धा दिवस अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर सारखे फायदे मिळत आहे. हाफ डे अनलिमिटेड डेटाही मिळतो.

BSNL चा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील फायदेशीर आहे. या प्लॅनची वैधता ही 30 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये डेली 2 GB डेटा व्यतिरिक्त सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतात.

हेही वाचा :

महाराष्ट्राला दोन ‘वंदे भारत’ स्लीपर मिळणार

गांधीजींनी कधीही टोपी घातली नाही, पण…PM मोदींनी दिली यशस्वी राजकारणी होण्याची गुरूकिल्ली

टाटा ग्रुपच्या टीसीएसच्या शेअर्समध्ये झेप

David Warner ची बॅट तुटली अन् डोक्यात पडली Video Viral