कोल्हापूरला महापूर आणणारा पाऊस जुलै-ऑगस्टमध्येच, सरासरी ८७ टक्के धरणे भरली

महापूर आणणारा सर्वाधिक पाऊस १५ जुलै ते १५ ऑगस्ट याच कालावधीत पडल्याचे(rainfall)आतापर्यंतचे चित्र आहे. २००५, २०१९, २०२१ या वर्षात अतिवृष्टी होऊन पावसाने जिल्ह्याला महापुराच्या संकटात आणले होते. गेल्या १७ वर्षांचा विचार करता प्रत्येक वर्षी जुलै ते ऑगस्टमध्येच सर्वाधिक पाऊस पडला आहे. यंदाही एक जूनपासून आतापर्यंत ४१८ मिमी पाऊस पडला आहे.दरवर्षी पडणाऱ्या पावसामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे. या काळात सरासरी ४०० मिमी पाऊस पडला आहे.

या काळात कोल्हापूरकरांना महापुराच्या संकटाला तोंड द्यावे लागले. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व पर्जन्यमापन केंद्रांवरील १७ वर्षांतील या कालावधीतील पडणाऱ्या पावसाची माहिती संकलित केली आहे. ही माहिती राज्य सरकारला कळविली आहे. या काळात होणारा पाऊस लक्षात घेता, सतर्कता बाळगून योग्य नियोजन केले आहे. मागचा अनुभव पाहता, या पावसामुळे कोणीही अडकून पडणार नाही? त्या दृष्टीने संबंधित भागातील नागरिकांना सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या पावसाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.यंदा मे महिन्यापासूनच पावसाची कोसळधार सुरू झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच वळीव पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. जून महिन्यातील नियमित पावसालाही वेळेत सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. (rainfall)एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ४१८ मिमी पाऊस पडला आहे. यात पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा पावसाचा जोर, धरणांत वाढलेला पाणी साठा, पडणारा पाऊस व पुढील काही दिवसांत होणारा पाऊस याचा अंदाज बांधल्यास पुन्हा महापुराच्या संकटाची टांगती तलवार जिल्ह्यावर आहे.

‘जिल्ह्यात १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. महापूरही याच पावसाच्या कालावधीत आला आहे. यंदा जिल्हा प्रशासनाकडून योग्य प्रकारे तयारी व नियोजन केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाची उघडझाप सुरू राहिली. शहरात दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात अर्ध्या फुटाने घट झाली. धरणक्षेत्रातील पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे सरासरी ८७ टक्के इतकी भरली आहेत. त्यामुळे येथील विसर्ग जैसे थेच सुरू ठेवण्यात आला आहे. यामुळे अनेक नद्यांची पाणी पातळी स्थिर असून, अद्याप ४८ बंधारे पाण्याखाली आहेत.गेल्या तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. आजही पावसाची उघडझाप सुरू राहिली. शहरात दिवसभरात अनेकवेळा जोरदार सरी कोसळल्या. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सकाळपासून रात्रीपर्यंत सात इंचाने कमी झाली. सकाळी ३० फूट आठ इंच असणारी पाणी पातळी रात्री ३० फूट एक इंचावर आली. दरम्यान, धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील १७ धरणे सरासरी ८७ टक्के इतकी भरली आहेत. तर चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कोदे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग कायम राहिला. गतवर्षी याच दिवशी सरासरी ६२ टक्के इतका पाणीसाठा धरणांमध्ये होता. (rainfall)आलमट्टी धरण ७१.२८ टक्के इतके भरले असून, एक लाख १५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.तसेच कोयना धरण ६६.५१ टक्के भरले असून, २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी पाच मि.मी. पाऊस पडला आहे. धरणातील विसर्गामुळे बहुतांश नद्यांची पाणी पातळी स्थिर राहिल्याने अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील सात, वेदगंगा नदीवरील सात, घटप्रभा नदीवरील सात, ताम्रपर्णी नदीवरील पाच, कासारी नदीवरील तीन, भोगावती नदीवरील चार, दूधगंगा नदीवरील चार, वारणा नदीवरील सहा, धामणी नदीवरील एक, तुळशी नदीवरील एक, हिरण्यकेशी नदीवरील तीन बंधाऱ्यांचा समावेश आहे.

राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक, घटप्रभा ३१७४ क्युसेक, वारणा धरणातून ४५०० क्युसेक, दूधगंगा १५०० क्युसेक, धामणी धरणातून २८०३ क्युसेक, कासारी धरणातून ८०० क्युसेक, कडवी धरणातून २४० क्युसेक, कुंभी धरणातून ३०० क्युसेक, सर्फनाला ९९२ क्युसेक, जंगमहट्टी धरणातून ४३५ क्युसेक, पाटगाव धरणातून ३०० क्युसेक, जांबरे धरणातून ६६७ क्युसेक, आंबेओहोळ धरणातून १४१ क्युसेक विसर्ग सुरू राहिला.पावसामुळे जिल्ह्यात २६ घरांच्या भिंती कोसळून ११ लाख एक हजारांचे नुकसान झाले. आतापर्यंत ३२१ घरांचे सुमारे एक कोटी १८ लाख ६१ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले.घटप्रभा धरण १०० टक्के, जंगमहट्टी धरण १०० टक्के, सर्फनाला धरण १०० टक्के, धामणी धरण १०० टक्के, वारणा धरण ८२ टक्के, राधानगरी धरण ८० टक्के, तुळशी धरण ७७ टक्के, दूधगंगा धरण ६६ टक्के, कडवी धरण ८५ टक्के, पाटगाव धरण ८८ टक्के, कुंभी धरण ७६ टक्के, चिकोत्रा धरण ७६ टक्के भरले.

हेही वाचा :

“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral