कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : चार दिवस चाललेल्या भारत आणि पाक दरम्यानच्या अघोषित युद्धामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावत शिष्टाई केली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता शस्त्र(weapon) संधी झाली. संभाव्य युद्धाचे ढग पांगले. पण ही शस्त्रसंधी म्हणजे पूर्ण विराम नव्हे. एकही दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्धास आमंत्रण ठरेल असा सज्जन देऊन टाकला भारताने चांगले आहे. शस्त्रसंधी होऊनही पुन्हा पाक लष्कराने हल्ले केल्याने पुन्हा संघर्ष उभा राहिला होता पण तो अल्पकाळ टिकला. एक राज्यकर्त्यांचा आजवरचा इतिहास पाहिला तर ही शस्त्रसंधी स्वल्पविराम ठरण्याची शक्यता अधिक आहे. यानिमित्ताने भारतीय लष्कराचे सामर्थ्य चिनी ड्रॅगनने पाहिल्याने त्याचेही आता भारताविरुद्धचे फुत्कार कमी होतील.

पाकिस्तानचे लष्करी आणि हवाई तळ उध्वस्त करणे, आणि जैश, आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांची मुख्यालय उध्वस्त करणे, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे उद्दिष्ट भारतीय लष्कराने पूर्ण केले आहे. भारताची कमीत कमी हानी आणि पाकिस्तानचे प्रचंड नुकसान हा हेतू पूर्ण झाला आहे. या ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानला ठेचून काढायचे हे टार्गेट होते. भारतीय सीमांचा विस्तार करण्याचा हेतू मात्र अजिबात नव्हता. या अघोषित युद्धात भारताने युद्ध नियम पाळले. पण पाकिस्तानाने नागरी विमानसेवा चालू ठेवून प्रवाशांचा ढाली सारखा वापर करून आपला भीषण चेहरा जगाला दाखवला.
टाकला कायमचा धडा शिकवावा, त्याचा तुकडा पाडावा, जनरल नियाजी हा जसा हाताला रुमाल बांधून, शर्मा गतीचे पांढरे निशाण हातात घेऊन जसा भारताला शरण आला होता तसाच पार्कचा विद्यमान लष्कर प्रमुख असीम मुनीर शरण आल्यानंतरच भारताने थांबायला हवे होते अशी लोक भावना होती. पण भारताने पाक वर अटी लादून, पहेलगाम दहशत काढल्यानंतर घेतलेले निर्णय कायम ठेवून शस्त्र संधी मान्य केली आहे. आपला दबदबा कायम ठेवला आहे. पहेलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्यावर त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडून त्यांना ठार मारणाऱ्या त्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्या असा आग्रह भारताने शस्त्र संधी मान्य करताना धरायला हवा होता किंवा तो धरलाही असेल.
शस्त्र(weapon) संधी नंतर पाकमध्ये मात्र सामाजिक तणाव वाढला आहे. शरीफ सरकार विरुद्ध लष्कर असा सत्ता संघर्ष सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. सत्र संधीनंतरही पाक लष्कर चार तास हल्ले करत होते. आम्हाला शस्त्रसंधी मान्य नाही. आम्ही शरीफ सरकारचा आदेश मान्य करणार नाही अशी भूमिका पाक लष्कराची दिसत होती. पार्कमध्ये पाच पक्षांच्या युतीचे सरकार हे केवळ अशी मुनीर यांच्यामुळे आले आहे. कारण मुनीर यांला इम्रान खान सरकार नको होते.
लोकशाहीतून निवडून सत्तेवर आलेले प्रत्येक सरकार हे लष्कराच्या प्रभावाखाली होते आणि ते आजही आहे हे सातत्याने अधोरेखित होत आले आहे. अशी मुनीर हे लष्कर प्रमुख असले तरी त्यांचे शिक्षण मदरशात झाल्यामुळे ते मुस्लिम धर्मगुरूच्या भूमिकेत जास्त प्रमाणात दिसत होते किंवा दिसत आहेत. पण त्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरसकथा पाकिस्तान मध्ये ऐकवल्या जातात.
नरेंद्र मोदी यांनी पहेलगाम दहशतकांड घडल्यानंतर वॉटर स्ट्राइक सह घेतलेले इतर सर्व निर्णय जैसे थे असणार आहेत. त्यातून पाकची सुटका होणार नाही.

सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय म्हणजे युद्ध कृती ठरेल असा यापूर्वी इशारा देणारे शरीफ, बिलावल भुट्टो यांना मोदी सरकारने शस्त्र(weapon) संधी करण्यापूर्वी चांगलीच चपराक दिली आहे. प्रत्यक्ष युद्धापेक्षा अन्य मार्गाने पार्कची मुस्कट झाली करण्याचा भारत सरकारचा इथून पुढे प्रयत्न असणार आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग न करता भारताने पाकच्या हद्दीत अगदी खोलपर्यंत घुसून हल्ले चढवून भयंकर नुकसान केले आहे.
ऑपरेशन सिंदूर हा आमचा अधिकार होता आणि तो आम्ही प्रभावीपणे वापरला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला आम्ही प्रतिहल्ला करून उत्तर दिलेले आहे. त्यामुळे शस्त्र संधीमध्ये भारताने आधी घेतलेल्या कठोर निर्णयांना कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही.
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा पुरस्कर्ता आहे. दहशतवादी संघटनांना पाकिस्तान सर्व प्रकारची मदत करत आहे हे गेल्या चार दिवसात भक्कम पुराव्यासह सिद्ध झाले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी संघटनांच्या नऊ तळावर भारताने एयर स्ट्राइक करून ते बेचिराख केले. त्यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारने मानवंदना दिली. जनाजावर पाकचे राष्ट्रध्वज पांघरले होते.
दफन विधीच्या वेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा भक्कम पुरावा भारताकडे आहे. पाकिस्तानचा बुरखा भारताने टराटरा फाडला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अघोषित युद्धामुळे भारताच्या बाजूने एक चांगली गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे चिनी ड्रॅगनला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसले आहे. या अघोषित युद्धात चायना मेड ड्रोन आणि शस्त्रे ही भारतासमोर कुचकामी ठरली आहेत.
आपल्यापेक्षा भारताचे लष्करी सामर्थ्य गुणात्मक दृष्ट्या उत्तम असल्याचे चीनला दिसले आहे. त्यामुळे हा ड्रॅगनही आता आपले विषारी फुत्कार सोडणार नाही. पहलगाम दहशतकांड ते शस्त्र संधी या अठरा दिवसांच्या दरम्यान चीनने पाकिस्तानचे तुणुतुने वाजवले होते. शस्त्र(weapon) संधी नंतर चिनी ड्रॅगन ची भूमिका काहीशी मवाळ झालेली दिसते.
नेहमीप्रमाणेच काही वाचाळ वीरांनी, अमेरिकेच्या मध्यस्थी बद्दल तक्रारीचा पाढा सुरू केला आहे. पाकिस्तानला ठोकून काढण्याची संधी आलेली असताना शस्त्र संधी करण्याची गरजच काय होती असा सवाल या वाचाळ वीरांचा आहे. या मंडळींनी एक रात्र सीमेवर काढून दाखवावी, म्हणजे त्यांना दाहकतेचे वास्तव दर्शन घडेल. पाकिस्तानचा आजपर्यंतचा भारत द्वेष पाहिला तर त्याच्याकडून शस्त्र संधीचे पालन केले जाईल असे वाटत नाही. थोडे दिवस हे पाकडे थांबतील आणि नंतर पुन्हा सीमेवर आपले वाकडे शेपूट दाखवतील.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी नवा मास्टर प्लान
‘या’ मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा…
भारत-पाकिस्तान दरम्यान आज पुन्हा हायव्होल्टेज चर्चा! शस्त्रसंधी तोडली तर…भारतीय लष्कराचा गंभीर इशारा