व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सीए परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांनी(students) सीए परीक्षेमधील यशाची परंपरा कायम राखली असून गेल्या पाच वर्षांमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी सीए परीक्षेमध्ये यशस्वीरित्या पात्र झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये महाविद्यालयाचे बारा विद्यार्थी सीए परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

“महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी(students) उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे. त्यांच्या या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक, त्यांची स्वतःची मेहनत, जिद्द व चिकाटी कारणीभूत असून ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून गौरवास्पद व अभिमानास्पद आहे.” असे उद्गार श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे कोषागार श्री. महेश बांदवलकर यांनी काढले. ते महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.श्री व्यंकटेश महाविद्यालयांमध्ये सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेंटर सुरू केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी होणारी तारांबळ कमी होऊन त्यांना शिक्षण किंवा अभ्यासासाठी वेळ मिळू लागला आहे.

अनेक विद्यार्थी(students) या सेंटर मधून परीक्षा देत आहेत. गेली अनेक वर्ष हे सेंटर या महाविद्यालयामार्फत चालवले जात असून गुणवत्ता पूर्ण परीक्षांचे आयोजन व नियोजन या महाविद्यालयाच्या सेंटरकडून केले जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय माने म्हणाले, ” महाविद्यालयाचा विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा यशस्वी होण्याचा चढता आलेख महाविद्यालयाची प्रगती निदर्शनास आणतो.

महाविद्यालयाकडून सीए परीक्षेची तयारी करण्यासाठी विविध पुस्तके लायब्ररीमध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत. प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी होत आहे. भविष्यात सीए फाउंडेशनचे क्लासेस सुरू करण्याचा विचार असून त्या संबंधित प्रयत्न केले जाणार आहेत “. कार्यक्रमासाठी ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री. श्रीकांत चंगेडिया हेदेखील उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विशेष कौतुक केले. सीए गणेश पेठकर, सीए रतन छापरवाल, सीए हारेंद्र घोलकर, सीए सुरज चौगुले, सीए अमरनाथ वाडेकर, सीए आशुतोष चंदुरे, सीए चैत्रा देवमोरे, सीए खुशी मुंद्रा, सीए शिवानी काळजे, सीए सेरेना दायमा, सीए. शितल पाटनी, सीए संस्कृती शाह अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मोहिनी आंचलीया हिने केले. आभार प्रदर्शन डॉ. एस. आर. ठाकर यांनी पार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा :

चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?

पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral