लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.(college) त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला
पुणे : पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या(college)चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याप्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे लॉ कॉलेज रस्त्यावरील शांतीलिला सोसायटीत राहतात.(college) २९ जुलै रोजी ते घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरटे मध्यरात्री सोसायटीत शिरले. त्यांचा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण साठविणारे ‘डीव्हीआर’ चोरून नेले. बुधवारी ज्येष्ठ नागरिक घरी परतले. तेव्हा चोरी झाल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक चांदणी शेंडे तपास करत आहेत.

विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर येथे देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी मोबाइल, मनगटी घड्याळे असा २९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. याबाबत २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार १२ जुलै रोजी नागपूरला गेल्या होत्या. तेव्हा ही चोरी झाली. अधिक तपास उपनिरीक्षक लाखे करत आहेत .
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. दररोज दोन ते तीन घटना उघडकीस येत आहेत. पण, या चोरट्यांना रोखण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. टोळ्या टेहाळणी करून घरफोड्या करत असताना पोलिसांची गस्त आणि पेट्रोलिंग नेमकी कुठे असते असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाईन शॉपी फोडली; इंग्लिश दारूच्या बॉटल चोरल्या
पुणे शहरात चोरट्यांकडून बंद घरांसोबतच आता दारूचे दुकाने देखील फोडली जात आहेत. बिबवेवाडी येथील कोठारी ब्लॉक येथील सोसायटीत असलेले क्रिस्टल वाईन शॉप चोरट्यांनी मध्यरात्री फोडले. चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व आतील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्यातून रोकड आणि इंग्लिश दारूच्या बॉटल असा एकूण ७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी राजेंद्र लोंढे (वय ५५) यांच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीची पडताळणी करून चोरट्यांचा माग काढला जात आहे.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष