महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील सह्याद्री अतिथिगृहात महादेवी अर्थात माधुरी हत्तीला वनतारा प्राणी संग्रहालयातून परत नांदणी मठात आणण्याबाबत उच्चस्तरीय बैठक (Meeting)आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत महादेवी हत्तीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यवाही आणि नियोजनावर सखोल चर्चा होणार आहे

या बैठकीस वन विभाग, महसूल व वन (वन्यजीव संरक्षण व संवर्धन विभाग) तसेच विविध शासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बैठकीस (Meeting)उपस्थित राहणाऱ्यांमध्ये वन मंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधींचा समावेश आहे
महादेवी हत्तीला वनतारामधून परत आणण्यासाठीच्या नियोजनावर यावेळी सविस्तर चर्चा केली जाणार असून संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारीनिशी आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत बैठकीत उपस्थित मान्यवर आणि अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष सूचना व उपाययोजना घेतल्या जाणार आहेत तसेच भविष्यातील अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक धोरण निश्चित केले जाईलया बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्राधान्यामुळे महादेवी हत्तीच्या संदर्भातील जनभावना लक्षात घेऊन शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा :
महादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त, कोल्हापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाकललं
महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर
‘मला बेशुद्ध करुन…’, अभिनेत्रीच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापासून वाचलं, कर्जाचा डोंगर झाल्याने रस्त्यावर काढली रात्र