राज्यात आज पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे विशेषत (issued)पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर १२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, आणि पालघरसह कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही आज हलक्याशा ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुणे जिल्ह्यात आज गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या पट्ट्यात विशेषतः विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूरसाठी विशेषतः (issued) यलो अलर्ट देण्यात आला आहे.महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार शेतीसंबंधित कामे आखण्याचा सल्ला दिला आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे आवाहन कृषी विभागाकडूनही करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यापैकी पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्याशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांसाठी हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट सध्या देण्यात आलेला नाही. मुंबई शहरात मात्र विजांच्या गडगडाटासह हलक्याशा पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे शहरातील काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि साचलेल्या पाण्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात, असा अंदाज आहे.
हेही वाचा :
तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून… नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो
ओव्हल टेस्ट जिंकवणाऱ्या सिराजचा भाव वाढला, BCCI कडून किती पैसे मिळणार ?