कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात कर्नाटक सरकारने(death)मंजुरीसाठी पाठवलेला प्रस्ताव केंद्र शासनाच्या जलसिंचन विभागाने परत पाठवला आहे. महाराष्ट्र सरकारने या उंची वाढवण्याबद्दल जे आक्षेप घेंतले आहेत त्याची चौकशी धरण सुरक्षा प्राधिकरण आता करणार आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असला तरी, अलमट्टी धरणाचे संकट पूर्णपणे टळलेले आहे असे म्हणता येणार नाही. या अलमट्टी धरणामुळे तब्बल तीन वेळा दक्षिण महाराष्ट्राला जलप्रलय आला सामोरे जावे लागलेले आहे.

विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण बांधलेले आहे.तेथील शेतकरी आणि सामान्य जनतेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हे धरण बांधण्यात आले असले तरी त्याचा सर्वाधिक धोका दक्षिण महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना आहे. हे धरण नव्हते तेव्हा कर्नाटकातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि सामान्य जनतेला पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होत नव्हते. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यावर अवलंबून राहावे लागत होते. शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यादरम्यानचा शेवटचा बंधारा राजापूर येथे आहे. (death)येथून पुढे कर्नाटकच्या हद्दीत पाणी सोडले जाते. तथापि शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासन आधी नियोजन करत असे.
इथली तहान आणि गरज भागल्यानंतर कर्नाटकात पाणी पुढे सोडले जात असे.25 वर्षांपूर्वी याच बंधाऱ्यावर अतिशय तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. हा बंधारा फोडण्यासाठी कर्नाटकातून आलेल्या जमावाला कोल्हापूर पोलिसांनी पांगवले होते आणि हवेत गोळीबारही केला होता. इसवी सन 2004 मध्ये अलमट्टी धरण बांधून पूर्ण झाले. या धरणात पाणी संचय केला जाऊ लागला.
2005 मध्ये कर्नाटकच्या जलसंपदा विभागाने अलमट्टी धर्मातील पाण्याचा विसर्ग पुरेशा प्रमाणात केला नाही परिणामी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातअति महापूर आला होता.(death) या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. इसवी सन 2019 आणि 2021 या पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महापुराचा महाप्रलयाचा मोठा फटका बसला होता. आणि हे सर्व अलमट्टी धरण आणि त्याची उंची वाढवण्यामुळे घडलेले आहे हे सुस्पष्ट झाल्यानंतर अलमट्टी धरणाची पुन्हा उंची वाढवली जाता कामा नये यासाठी राज्य शासन सतर्क झाले होते.

या धरणाची उंची उंची वाढवली तर दक्षिण महाराष्ट्र पाण्याखाली जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती आणि म्हणूनच येथून पुढे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येऊ नये यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारला साकडे घातले होते. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे याबद्दल महाराष्ट्र हिताचा निर्णय घेण्यास विनंती केली होती. याच दरम्यान राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास स्थगिती घेतली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांना एक व्यापक शिष्ट मंडळ भेटले. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर दक्षिण महाराष्ट्राचे मरण कसे आहे याचे तपशिलपूर्वक निवेदन दिले. पुरावे सादर केले, आणि प्रत्यक्ष चर्चा केली. दक्षिण महाराष्ट्राचा जलप्रलोयाचा धोका कायमस्वरूपी टाळण्यासाठी अलमट्टी धरण उंची वाढवण्यास कायमस्वरूपी मनाई करावी, तसा परवाना देऊ नये अशी विनंती या शिष्टमंडळाने केल्यानंतर केंद्र शासनाने अलमट्टी धरण उंची वाढवण्याच्या संदर्भातील प्रस्ताव कर्नाटकाकडे परत पाठवलेला आहे.
महाराष्ट्र सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबद्दल जे आक्षेप घेतलेले आहेत, त्याची शहानिशा करण्यासाठी, वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी कर्नाटक सरकारचा हा प्रस्ताव आता केंद्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाकडे चौकशीसाठी पाठवला जाणार आहे.आता हा प्रस्ताव प्राधिकरणाकडे गेलेला असला तरी तसेच सर्वोच्च न्यायालयात तो प्रलंबित असला तरी महाराष्ट्र शासनाने आतापासूनच या धरणाची उंची भविष्यातही वाढवता कामा नये यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत. कृष्णा जलवाटप कराराबद्दलही फेरविचार केला जावा यासाठी प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे.
अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात महाराष्ट्र सरकारला मिळालेला दिलासा हा कायमस्वरूपी आहे असे म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ विधीज्ञा कडून राज्य सरकारने आपली बाजू मांडली पाहिजे. धरणाची उंची वाढवली गेली तर दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेची जीवित आणि वित्त हानी किती मोठ्या प्रमाणावर होणार आहे हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने उंची वाढवण्यास कायमस्वरूपी नकार दिला तरच दक्षिण महाराष्ट्रावरील अलमट्टी चा धोका संपुष्टात येणार आहे.
हेही वाचा :
तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून… नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो
ओव्हल टेस्ट जिंकवणाऱ्या सिराजचा भाव वाढला, BCCI कडून किती पैसे मिळणार ?