दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे.पुणे विभागात एफडीएच्या पथकाने (Food and Drug) एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तब्बल १ हजार ३२९ किलो वजनाचा संशयास्पद खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

या कारवाईदरम्यान पथकाने ३५८ किलो बदाम, ४९३ किलो काळे मनुके आणि ४७८ किलो डाळीचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा आणि मानांकनांच्या नियमांचे तसेच पॅकिंगवरील योग्य लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण अन्नसाठ्याची बाजारातील अंदाजे किंमत ६ लाख ५८ हजार २७५ रुपये इतकी आहे. सणाच्या काळात मिठाई आणि सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, (Food and Drug) याच संधीचा फायदा घेऊन काही व्यापारी निकृष्ट किंवा विनापरवाना माल बाजारात विकण्याची शक्यता असते.
ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता एफडीए प्रशासनाने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. नागरिकांनी सण-सुदीच्या काळात कोणतीही खाद्यपदार्थ किंवा सुकामेवा खरेदी करताना पाकिटावर दिलेली एक्सपायरी डेट (मुदत), उत्पादनाची तारीख आणि बॅच क्रमांक आवर्जून तपासून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Food and Drug) तसेच, भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तातडीने एफडीएशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दिवाळीत अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार आहेत.
हेही वाचा :
कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर