वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मंगरूळपीर (shocking) तालुक्यातील कवठळ येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका ७ वर्षीय चिमुरडीला भरधाव कारने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात चिमुरडीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली (shocking) असून, हा थरार पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर ७ वर्षांची चिमुरडी आपल्या आजोबांसोबत कवठळ येथील आठवडी बाजारात गेली होती. बाजार आटोपून आजोबांसोबत घरी परतत असताना, रस्ता ओलांडत असताना मागून आलेल्या एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता की चिमुरडी या धडकेत गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयाकडे रवाना केले. (shocking) मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिची प्राणज्योत मालवली. आजोबांसोबत बाजारात गेलेल्या चिमुरडीवर अचानक काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कवठळ परिसरासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?