पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. (discontent) अशातच आता एका बड्या खासदाराने अमित शाह यांची भेट घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरली होती, त्यानंतर टीएमसीच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करून NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पंजाबमधील काँग्रेसचे काही खासदार आणि नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. कारण पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमरिंदर सिंह राजा वडिंग यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी नाराज झाले आहेत. तर एका बड्या खासदाराने अमित शाह यांची भेट घेतली आहे, त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
चन्नी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पंजाबमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. (discontent) त्यापूर्वी चन्नी आणि समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चन्नी यांच्या घरी सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला 60 हून अधिक नेते उपस्थित होते. त्यामध्ये नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक समित्यांतील अनेक सदस्य तसेच 20 हून अधिक विद्यमान आणि माजी आमदार सहभागी झाले होते. यात माजी मंत्री तृप्त राजिंदर बाजवा, सुखबिंदर सरकारिया, ओ. पी. सोनी, भरत भूषण आशू, परमिंदर पाल पिंकी यांच्यासह दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंह हेही उपस्थित होते.
पंजाब काँग्रेसमध्ये नाराजी असताना पक्षाच्या कोअर कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रंधावा यांनी या भेटीला कोणताही राजकीय रंग नाही असं म्हणत ही भेट पूर्वनियोजित होती अशी माहिती दिली आहे. मात्र या पक्षातील नाराजी आणि राजकीय परिस्थितीचा विचार करता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. चन्नी गटाच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना रंधावा यांनी म्हटले की, ‘ही परिस्थिती दुर्दैवी आहे. इतक्या विस्तृत चर्चेनंतरही अशी वेळ का आली, (discontent) याचा विचार होणे गरजेचे आहे. परिस्थिती तुम्ही समजत आहात तितकी गंभीर नाही. मात्र इतक्या बैठका झाल्यानंतरही काही नेते नाराज असणे दुर्दैवी आहे. या बदलांबाबत काँग्रेस निरीक्षक अजय माकन यांनी पक्षश्रेष्ठींना नेमका काय अहवाल दिला होता, याचे उत्तर तेच देऊ शकतात.’
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?