१३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार नंतर गळा दाबून संपवलं?

बिहारमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मामानेच आपल्या मूक-बधिर भाचीसोबत हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे बिहार हादरले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी (murdered) अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मनोज मांझी असं आरोपीचे नाव आहे. आरोपी सहबहदा येथे राहतो. पण २०१७ पासून तो पीडित मुलगी राहत होती त्या गावात राहण्यासाठी आला. त्याठिकाणीच तो स्वत:चे वेगळे घर बांधून राहत होता. आरोपीने घरात झोपलेल्या मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले.

२१ जूनच्या रात्री ११ वाजता आरोपी मनोज पीडितेच्या घरात घुसला. त्याने मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपेत असताना पीडित मुलीचे अपरहण केले. पीडित मुलीला खांद्यावर घेऊन तो पळून गेला. शेतात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. (murdered) त्यानंतर त्याने पीडित मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी केली तेव्हा आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी श्वानपथकाद्वारे या घटनेचा तपास केला. तेव्हा आरोपी गाव सोडून फरार झाला. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. (murdered) त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेत त्याला पकडलं. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?