सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या (Court)आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिला सोलापूर सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनीषा मुसळे-मानेला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांनी आज तिला न्यायालयात हजर केले होते.यावेळी, पोलिसांनी न्यायालयात आरोपी मनीषा माने विरोधात अनेक नवीन आणि गंभीर आरोप केले, ज्यात प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहाराचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत ४२ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, डॉ. वळसंगकर यांच्या एसपी न्यूरोसायन्स रुग्णालयात आरोपी मनीषा मुसळे-माने हिने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे.(Court)आरोपी मनीषा मुसळे-माने हिची बँकेत तीन खाती असल्याचे उघड झाले आहे. या खात्यांमधील जवळपास ७० लाख रुपयांवर कोणताही कर भरलेला नाही. तसेच, तिच्या पगाराव्यतिरिक्त ३९ लाख रुपये तिच्या खात्यामध्ये कोठून आले, याचा कोणताही ठोस पुरावा ती देऊ शकलेली नाही, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला. इतकेच नव्हे तर, आरोपी मनीषा मुसळे-माने हिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देऊन, त्यांच्या माध्यमातून बँकेत पैसे वळते करून घेतल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. या सर्व आरोपांच्या सखोल चौकशीसाठी तिची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली. दुसरीकडे,(Court) आरोपी मनीषा मानेच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, “मयत डॉ. शिरीष वळसंगकर किंवा फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर यांनी मनीषा मुसळे-मानेवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केलेला नाही. केवळ जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पोलिसांनी जुनीच कारणे पुन्हा नव्याने पुढे आणली आहेत.” या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
स्था. स्व. संस्था निवडणुका जे राज्यात, तेच कोल्हापुरात राजकीय प्रवाह बदलले
‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी
Virat Kohali ने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती; भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठा धक्का