माधुरीच्या देखभाल आणि पुनर्वसनासाठी वनताराचे अधिकृत निवेदन

नांदणी गावातील जैन मठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेसाठी माधुरी हत्ती ही केवळ एक प्राणी (Animal)नसून ती एक धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती कोल्हापूरच्या आध्यात्मिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहे. याची जाणीव वनतारास असून, त्या अनुषंगानेच त्यांनी आपले अधिकृत निवेदन सादर केले आहे.

वनताराने स्पष्ट केले आहे की माधुरीच्या स्थलांतराचा निर्णय त्यांच्या हातात नव्हता. मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक आदेशानुसारच वनताराने फक्त माधुरीची देखभाल, तिच्या आरोग्याची काळजी आणि निवासाची जबाबदारी पार पाडली आहे. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी माधुरीच्या स्थलांतराची शिफारस केली नाही किंवा स्थलांतरास प्रारंभ केला नाही(Animal). धार्मिक भावना किंवा परंपरेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू वनताराचा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माधुरीला कोल्हापूरमध्ये परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि महाराष्ट्र सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेस वनतारा पूर्णपणे पाठींबा देत असून, न्यायालयीन मान्यतेनुसार तांत्रिक आणि वैद्यकीय सहाय्य देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. या व्यतिरिक्त, वनताराने नांदणी परिसरात माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मठ, राज्य शासन आणि न्यायालयाच्या मान्यतेनंतरच राबवला जाईल.

प्रस्तावित पुनर्वसन केंद्रात हत्तीच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा समावेश असेल. त्यामध्ये हायड्रोथेरपीसाठी जलतलाव, नैसर्गिक हालचालीसाठी स्वतंत्र तळे, लेसर थेरपी कक्ष, विश्रांतीगृह, हिरवळयुक्त मोकळी जागा, वाळूचा हौद, ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना आणि रबराइज्ड फ्लोअरिंगसह इतर विविध सोयी असतील. माधुरीच्या पायांच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी मऊ वाळूचे विशेष क्षेत्र देखील तयार केले जाईल.

वनताराने हे देखील स्पष्ट केले आहे की त्यांचा हा प्रस्ताव कोणत्याही स्वार्थासाठी किंवा श्रेयासाठी नाही. त्यांनी तो केवळ माधुरीच्या हितासाठी, कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनासाठी आणि भविष्यातील देखभाल सुनिश्चित करण्यासाठी मांडला आहे. न्यायालय किंवा मठ यांच्याकडून पर्यायी प्रस्ताव आल्यास, त्यालाही ते मनापासून सहकार्य करतील.

जैन मठाला आवश्यक असलेले सर्व सहकार्य वनतारा देण्यास तयार असून, कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. “मिच्छामी दुक्कड़म” म्हणत त्यांनी क्षमायाचना केली असून, सर्वांनी एकत्र येऊन माधुरीसाठी प्रेमाने आणि सामंजस्याने पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

आईचा अमानुष निर्णय: 45 वर्षांच्या सावत्र मुलाशी अल्पवयीन लेकीचं लग्न ठरवलं
कोल्हापुरकरांना सुनावलं, शेट्टींवर संताप; हिंदुस्तानी भाऊ अंबानींच्या समर्थनात
चिपरीत २२ वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याने खळबळ