राज्यात राबवण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (million)आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण ९ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख कार्डाची निर्मिती पूर्ण झाली आहे. यानुसार राज्यात सध्या सुमारे ३७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून उर्वरित ६३ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.योजनेचे फायदे आणि व्याप्ती

या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार (million) सुविधा देण्यात येते. हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, अपघात उपचारांसह हजारहून अधिक उपचार पॅकेजेसचा समावेश असल्यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या कार्डधारकांची संख्या एकूण पात्र लोकसंख्येच्या एक तृतीयांशाहून अधिक असल्याचे चित्र आहे.ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरीब भागात आयुष्मान कार्डमुळे कॅशलेस उपचारांची उपलब्धता वाढली असून वैयक्तिक आरोग्य खर्चात लक्षणीय घट झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्येही या कार्डच्या आधारे उपचार शक्य होत असल्याने नागरिकांचा सहभाग वाढत आहे.

राज्यातील आयुष्मान कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास आरोग्य(million) सेवांतील असमानता कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व परवडणारी उपचार व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व आरोग्य योजना विशेष नोंदणी मोहिमा, आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायत स्तरावरील कार्ड निर्मिती, तसेच शहरी भागात मोबाईल युनिट्सद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे.तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी म्हटले आहे.है कार्ड तयार करताना प्रत्येक केवायसीसाठी ५ रुपये दिले जात. आता दर वाढवून २० रुपये दिले जात आहेत, तर कार्ड वितरणासाठी ३ रुपयावरून १० रुपये दर करण्यात आला आहे. असे यात एकूण मानधन आता ३० रुपये करण्यात आला आहे.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य