महाराष्ट्राच्या दिशेने मॉन्सूनची वाटचाल वेगवान; ७ ते ८ जूनदरम्यान आगमन

नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल वेगाने सुरू (expected) असून ७ ते ८ जूनच्या सुमारास तो राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या विविध मॉडेल्स आणि अंदाजांतून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी परिसरात मॉन्सूनसदृश ढगांची घनता वाढताना दिसत असून दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने त्याची प्रगती सुरू आहे.ताज्या उपग्रह निरीक्षणांनुसार केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर ढगांच्या पट्ट्यांची तीव्रता वाढली आहे. केरळमधील कोची येथील डॉपलर रडार निरीक्षणांमध्ये मध्यम तीव्रतेचे मॉन्सूनसदृश ढगांचे पट्टे स्पष्टपणे दिसून येत आहेत. यामुळे मॉन्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘टायफून जांगमी’चे रूपांतर आता (expected) बाह्यउष्णकटिबंधीय कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे नैऋत्य मॉन्सूनच्या वाऱ्यांना उत्तरेकडे सरकण्यास अधिक अनुकूलता मिळाली असून मॉन्सूनच्या मुख्य प्रवाहाला गती मिळत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनचा पट्टा अधिक सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य अरबी समुद्र, संपूर्ण गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूचे उर्वरित भाग तसेच बंगालच्या उपसागरातील काही क्षेत्रे आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.यामुळे दक्षिण कोकण, गोव्याला लागून असलेले दक्षिण महाराष्ट्रातील भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रारंभीच्या मान्सून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या अधिकृत महाराष्ट्र (expected) प्रवेशाकडे लागले आहे.

हेही वाचा :

‘तर थेट कारवाई करू’ महाविद्यालयांना मोठा झटका

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी

“आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’