लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मानधनाबाबत आणि लाभार्थी यादीतील मोठ्या बदलांविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेद्वारे पात्र महिलांना प्रतिमहिना आर्थिक साहाय्य पुरवले जाते. नुकत्याच पार पडलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर लाभार्थी यादीचे पुनरावलोकन करण्यात आले असून, (Ladki Bahin Yojana) यामुळे आगामी हप्त्यांच्या वितरणावर आणि एकूण लाभार्थी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार पात्र महिलांना काही दिवसांपूर्वीच मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये देण्यात आले होते, ज्याचे वाटप १५ मे नंतर सुरू झाले होते. (Ladki Bahin Yojana) आता चालू जून महिन्याचे पहिले काही दिवस उलटून गेले तरी मे महिन्याचे १,५०० रुपये खात्यात न आल्याने महिलांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.महिला व बालविकास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या १२ ते १५ तारखेच्या दरम्यान कधीही पात्र भगिनींच्या बँक खात्यामध्ये १५,५०० रुपयांची ही रक्कम जमा केली जाऊ शकते, असे प्रशासकीय पातळीवरून संकेत मिळत आहेत.

ई-केवायसी प्रक्रियेमुळे ८० लाख महिला यादीतून बाहेर योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मध्यंतरी ई-केवायसी करण्याचे बंधनकारक केले होते. या प्रक्रिये दरम्यान अपूर्ण माहिती, निकषांची पूर्तता न होणे किंवा ई-केवायसी न करणे यांमुळे तब्बल ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. या मोठ्या कपातीमुळे या महिलांना मिळणारा मासिक लाभ तूर्तास बंद झाला आहे.या प्रशासकीय तपासणीनंतर आता लाडकी बहीण योजनेचा अधिकृत लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या घटून १ कोटी ६६ लाख इतकी झाली आहे. (Ladki Bahin Yojana) दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित राहिलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे भविष्यात या महिलांना पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद

भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार

पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?